हैदराबाद - येथील वनस्थलीपुरम पोलीस स्टेशन अंतर्गत सहारा गेट येथे एक कुत्रा मृत नवजात अर्भकाला घेऊन जात असताना दिसला. सहारा रोडवरील विवेकानंद पुतळ्याजवळ दुधाच्या दुकानासमोर बसलेल्या मंचना महेंद्र नावाच्या व्यक्तीला हा भटका कुत्रा तोंडात मृत अर्भक घेऊन फिरताना दिसला. कुत्र्याने त्यांच्या जवळ जाऊन अर्भकाला जमिनीवर फेकले. हे पाहून मंचना घाबरल्या. मात्र, त्यांनी प्रसंगावधाना राखून 100 वर फोन करून घटनेची माहिती पोलिसांना दिली.
वनस्थलीपुरम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या घटनेची माहिती मिळताच वनस्थलीपुरम येथील पोलिसांचे पथक आले. त्यांनी कुत्र्याचा शोध घेतला. बाळाचा जन्म कमी दिवसांत झाला असल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा कयास पोलिसांनी लावला. तसेच, त्याचा मृतदेह योग्यपणे मातीत पुरला नसल्याने त्याच्या वासाने कुत्र्याला हे मृत अर्भक सापडले असे असा अंदाज एसीपी के. पुरुषोथम रेड्डी यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, वनस्थलीपुरम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्त्री अर्भकाचा मृतदेह आणि एका भ्रूणाचा मृतदेह सापडला
भटक्या कुत्र्याने कोणत्या ठिकाणाहून अर्भक उचलले हे ओळखण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. कोणत्या हॉस्पिटलने मृतदेहाची विल्हेवाट लावली याबद्दलही तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती एसपी के. पुरुषोथम रेड्डी यांनी दिली आहे. नुकतेच शमीरपेठ आणि उप्पल येथे एका स्त्री अर्भकाचा मृतदेह आणि एका भ्रूणाचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणांचाही तपास सुरू आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
हेही वाचा - Major Accident Buldana : शेगावला जाणाऱ्या बोलेरो गाडीला अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू