हैदराबाद - नाम रंगी रंगली दीपावली या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन हैदराबादमध्ये करण्यात आले आहे. येथील मराठी लोक नेहमीच विविध सण समारंभ उत्साहाने साजरा करतात. गणेशोत्सव, शिवजयंती, दसऱ्याबरोबरच दिवाळीचा सणही हैदराबादमथ्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी विविध कार्यक्रमांच्याबरोबरच दिवाळी पहाट कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात राजेश दातार, अंजली मराठे, रमा कुलकर्णी, अमोल निसळ, आसावरी गोडबोले, भाग्यश्री अभ्यंकर यांच्या गायनाचा आस्वाद घेता येणार आहे. त्यांना अमोल कुलकर्णी यांची तबला साथ असणार आहे. तर प्रसाद जोशी पखवाज आणि ढोलकची साथ करणार आहेत. त्याचबरोबर निनाद सोलापूरकर यांच्यासह इतरांची संगीत साथ असेल. हार्मोनियम साथ आणि संगीत नियोजन आशिष मुजुमदार करणार आहेत. अभिनेते राहुल सोलापूरकर यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे.
रविवारी सकाळी 8 वाजता रविंद्र भारतीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सर्वांसाठी या कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश असेल. प्रथम येणाऱ्यास प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी हैदराबादमधील रसिक मराठी प्रेक्षकांनी येण्याचे आवाहन आयोजक अखिलेश वाशिकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.