ETV Bharat / bharat

Diwali Celebration : भारतातील विविध राज्यात विविध परंपरेने साजरी केली जाते दिवाळी, पाहुया रिपोर्ट

दिवाळी हा भारतातील (India Diwali Celebration) सर्वात मोठा सण (Diwali is celebrated) आहे. हा सण एक प्राचीन हिंदू सण आहे, जो दरवर्षी शरद ऋतूमध्ये (उत्तर गोलार्ध) साजरा केला जातो. भारतात साजऱ्या होणाऱ्या सर्व सणांमध्ये दीपावलीला सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. त्याला दीपोत्सव असेही म्हणतात. आपल्या देशात दीपावली हा दिव्यांचा सण पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत वेगवेगळ्या (different traditions in different states) प्रकारे साजरा केला जातो. Diwali Celebration

Diwali Celebration
भारतात साजरी होणारी दिवाळी
author img

By

Published : Oct 18, 2022, 1:47 PM IST

दिवाळी (Diwali is celebrated) हा सण इतर सणांप्रमाणेच भारताच्या (India Diwali Celebration) विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने (different traditions in different states) साजरा केला जातो. लोक आपापल्या चालीरीती आणि परंपरेनुसार हा सण साजरा करतात. दिवाळीत अनेक ठिकाणी स्वच्छता आणि सजावटीसह लक्ष्मी व गणेश देवतांची पूजा करून साजरी केली जाते. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की, देशाच्या विविध भागात दिवाळी साजरी करण्याची परंपरा कश्या प्रकारे आहेत.Diwali Celebration

Diwali Celebration
भारतात साजरी होणारी दिवाळी

महाराष्ट्रातील दिवाळी : महाराष्ट्रात दिवाळीची सुरुवात वसु बारसच्या विधीने करण्याची परंपरा आहे. वसु बारस या दिवशी गायींची पूजा केली जाते. याशिवाय प्राचीन डॉक्टर धन्वंतरी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक धनत्रयोदशी साजरी करतात. दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लोकही लक्ष्मीची पूजा करतात. या दरम्यान पती-पत्नीचे प्रेम साजरे करण्यासाठी 'दिवाळीचा पाडवा' साजरा केला जातो. 'भाऊ बीज' आणि 'तुलसी विवाह' ने उत्सवाची सांगता होते. यानंतर विवाहाचा शुभ मुहूर्त सुरू होतो.Diwali In Maharashtra

हिंदी भाषिक राज्यांमधील दिवाळी : आपल्या देशातील 10 हिंदी भाषिक राज्यांमध्ये, घर आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची साफसफाई केली जाते. रंगरंगोटी करून लक्ष्मी व गणेशाची पूजादेखील केली जाते. तसेच आसपासच्या घरांमध्ये मिठाई आणि भेटवस्तूंचे वाटप करून दीपोत्सव साजरा केला जातो. येथील लोकांचा असा विश्वास आहे की, हा लंकेतील भगवान श्री रामाच्या विजयानंतर साजरा करण्यात येणारा सण आहे. या दिवशी लोक लक्ष्मी गणेशाच्या नवीन मूर्ती त्यांच्या घरी, कार्यालयांमध्ये आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये आणुन पूजा करतात.

याशिवाय वाराणसीतील गंगा घाट आणि अयोध्येतील सरयू येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करून दिवाळी साजरी केली जाते. अयोध्येत सरयूच्या काठावर दीपावलीच्या दिवशी, तर वाराणसीमध्ये देव दीपावलीच्या दिवशी लाखो दिव्यांची सजावट केली जाते. या दिवशी नद्यांच्या काठावर वसलेल्या या दोन शहरांचे सौंदर्य पाहायला मिळते.Diwali in Hindi speaking states

Diwali Celebration
भारतात साजरी होणारी दिवाळी

पश्चिम बंगालमधील दिवाळी : पश्चिम बंगालमध्ये दीपावलीच्या दिवशी काली पूजा किंवा श्यामा पूजा करतात. या दिवशी देवी कालीला जासवंदाच्या फुलांनी सजविली जाते आणि मंदिरे आणि घरांमध्ये तिची विशेष पूजा केली जाते. यानंतर भक्त माँ कालीला मिठाई, डाळी, तांदूळ आणि मासे यांचा नैवेद्य दाखविला जातो. करतात. यासह, काली पूजेच्या एक रात्री, बंगालचे लोक भूत चतुर्दशी विधीदेखील करतात. त्यांच्या घरात 14 दिवे लावून वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी ही विधी केली जाते.Diwali in West Bengal

ओडिशातील दिवाळी : ओडिशात दिवाळीच्या निमित्ताने लोक कौरिया काठी नावाची परंपरा पाळतात. ही एक स्थानिक विधी आहे. त्यामध्ये लोक स्वर्गीय पूर्वजांची पूजा करतात. ते त्यांच्या पूर्वजांना बोलावण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तागाच्या काड्या जाळतात. दिवाळी दरम्यान, ओरिया लोक देवी लक्ष्मी, भगवान गणेश आणि देवी काली यांची देखील पूजा करतात.Diwali in Odissa

Diwali Celebration
भारतात साजरी होणारी दिवाळी

गुजरातमधील दिवाळी : गुजरातमध्ये दिवाळी दुप्पट उत्साहात साजरी केली जाते. यावेळी गुजरातमधील लोकांचे चालू वर्ष संपून नवीन वर्ष सुरू होते. गुजराती लोक दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गुजराती नववर्ष म्हणून बेस्टु बारस साजरे करतात. येथे सणांचीही मोठी परंपरा आहे. त्यांचे सण वाघ बारसपासून सुरू होतात, त्यानंतर धनत्रयोदशी, काली चौदस, दिवाळी, बेस्टू बारस आणि भाऊबीज एवढे दिवस हा सण चालतो. Diwali in Gujrat

गोव्यामधील दिवाळी : गोव्यात दिवाळी हा सण भगवान श्रीकृष्णाची पूजा करून साजरा केला जातो. नरकासुर या राक्षसाचा वध केल्यावर दिवाळी हा सण साजरा केला जातो, असे ते मानतात. दिवाळीच्या एक दिवस आधी, नरकासुर चतुर्दशीच्या दिवशी लोक नरकासुराचा एक मोठा पुतळा बनवून त्याचे दहन करतात.Diwali in Goa

Diwali Celebration
भारतात साजरी होणारी दिवाळी

पंजाबमधील दिवाळी : दीपावली हा पंजाब आणि हरियाणातील शिखांसाठीदेखील एक महत्त्वाचा सण आहे. कारण याच दिवशी 1577 मध्ये अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती. 1619 मध्ये दिवाळीच्या दिवशी सहावे शीख गुरु हरगोविंद सिंग यांची तुरुंगातून सुटका झाली होती. बाहेर पडल्याच्या आनंदात पंजाबचे लोक दिवे लावतात आणि मिठाई वाटून आतिषबाजी करतात.Diwali in Punjab

तमिळनाडूतील दिवाळी : तामिळनाडूतील लोक पारंपारिकपणे तिळाच्या तेलाने आंघोळ करतात. ते नवीन कपडे घालून आणि फटाके फोडून दिवाळी साजरी करतात. तमिळ लोक या दिवशी त्यांच्या शेजारी आणि नातेवाईकांसोबत मिठाई, शेवया आणि खास दिवाळी लेजियम पदार्थ (एक प्रकारचे हर्बल जाम) यांची देवाणघेवाण करतात. याशिवाय अनेक लोक याच दिवशी मंदिरात जाऊन विशेष पूजा आणि प्रार्थना देखील करतात. रात्री दिव्यांनी घरे सजवण्याची आणि रात्री उशिरापर्यंत फटाके फोडण्याची परंपरा देखील तामिळनाडूत आहे.Diwali in Tamilnadu. Diwali Celebration

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.