ETV Bharat / bharat

Delta Plus : एक रुग्ण गेला कुठे? राज्य आणि केंद्र सरकारच्या आकडेवारीत तफावत

author img

By

Published : Jun 25, 2021, 6:47 PM IST

Updated : Jun 25, 2021, 7:04 PM IST

राज्य आणि केंद्र सरकारने आज डेल्टा प्लस रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे. यात दोन्ही आकडेवारीमध्ये एका रुग्णाची तफावत जाणवत आहे.

corona
संग्रहित फोटो

मुंबई - राज्यातील सात जिल्ह्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रीय रोग नियंत्रण संस्थेने (एनसीडीसी) महाराष्ट्रात एकूण 20 डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण असल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या आकडेवारीत तफावत असल्याचे समोर आले आहे. केंद्राने सुरुवातीला देशात एकूण 48 रुग्ण असल्याची यादी जाहीर केली होती. त्यानंतर त्यात दुरुस्ती करत देशात एकूण 50 रुग्ण असल्याचे सांगितले आहे.

  • आरोग्यमंत्री टोपे यांनी दिलेली माहिती -
    आरोग्यमंत्री टोपे यांनी दिलेली माहिती

तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभाग तयारीला लागला आहे. या लाटेला थोपवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स स्थापन करण्यात येऊन आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच राज्यात २१ डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

  • केंद्राच्या एनसीडीसीची आकडेवारी -
    ncdc
    एनसीडीसीची आकडेवारी

आज केंद्राच्या एनसीडीसी विभागाने देशातील डेल्टा प्लस व्हेरिएंटची एकूण आकडेवारी मांडली. या आकडेवारीत सुरुवातीला देशात एकूण 48 रुग्ण असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यात बदल करत देशात एकूण 50 डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण असल्याची आकडेवारी दिली आहे. दरम्यान, सुरुवातीला दिलेल्या आकडेवारीत महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 20 डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याची आकडेवारी दिली होती. त्यामुळे राज्य आणि केंद्राने दिलेल्या आकडेवारीत एका आकड्याची तफावत असल्याचे समोर आले होते.

  • राज्यात कुठे आढळले डेल्टा प्लसचे रुग्ण?

महाराष्ट्रात आढळलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण रत्नागिरी, जळगाव, मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आहेत. रत्नागिरीमध्ये 9, जळगावमध्ये 7, मुंबईमध्ये 2, पालघर, ठाणे आणि सिंधुदुर्गमध्ये एक रुग्ण समोर आला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

  • डेल्टा प्लस विषाणूने घेतला राज्यातील पहिला बळी -

रत्नागिरी जिल्ह्यात राज्यातील पहिला डेल्टा प्लस विषाणूने रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत महिला ही संगमेश्वरमधील आहे. मृत महिलेचे वय हे 80 वर्ष होते. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. डेल्टा प्लस विषाणूची लागण होण्यापूर्वी या महिलेला इतरही आजार होते. अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.

Last Updated : Jun 25, 2021, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.