नवी दिल्ली Dense Fog in Delhi : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी धुक्यामुळं रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक गाड्या 5 ते 6 तास उशिरानं धावत आहेत. त्यामुळं प्रवाशांचे हाल होत आहेत. तसंच दिल्लीहून महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वे 10 ते 12 तास उशिरानं येत आहेत.
महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वे 10-12 तास उशिरा : उत्तर भारतात धुक्यामुळं दिल्लीकडून महाराष्ट्रात येणाऱ्या बहुतांश रेल्वे 10-12 तास उशिरानं धावत आहेत. यामध्ये अमृतसर-नांदेड सचखंड सुपरफास्ट एक्सप्रेस सर्वाधिक 30 तास उशिरानं धावत आहे. तसंच अमृतसर-मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस 16 तास उशिरानं धावत आहे. जम्मुतावी-पुणे झेलम एक्सप्रेस 6 तास, अयोध्या कॅंट-लोकमान्य टिळक टर्मिनस साकेत एक्सप्रेस 5 तास, हजरत निजामुद्दीन-वास्को द गामा गोवा एक्सप्रेस 6 तास, हजरत निजामुद्दीन-हुबळी सुपरफास्ट एक्सप्रेस 12 तास, नवी दिल्ली-केएसआर बंगळुरू एक्सप्रेस 6 तास, भागलपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 5 तास उशिरानं धावत आहेत.
-
कोहरे के कारण दिल्ली क्षेत्र में 21 ट्रेनें देरी से चल रही हैं: भारतीय रेलवे pic.twitter.com/VD4YzChyoI
— ANI_HindiNews (@AHindinews) January 1, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">कोहरे के कारण दिल्ली क्षेत्र में 21 ट्रेनें देरी से चल रही हैं: भारतीय रेलवे pic.twitter.com/VD4YzChyoI
— ANI_HindiNews (@AHindinews) January 1, 2024कोहरे के कारण दिल्ली क्षेत्र में 21 ट्रेनें देरी से चल रही हैं: भारतीय रेलवे pic.twitter.com/VD4YzChyoI
— ANI_HindiNews (@AHindinews) January 1, 2024
अनेक रेल्वे उशिरा : उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी सांगितलं की, 1 जानेवारीला बाधित गाड्यांपैकी रीवा-आनंद विहार टर्मिनल एक्स्प्रेस 5 तास उशिरानं धावत आहे. तर राणी कमलापती भोपाळ-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस 4 तास, राजेंद्र नगर-नवी दिल्ली 4 तास, हैदराबाद-नवी दिल्ली 4 तास आणि मुंबई-फिरोजपूर 4 तास उशिरानं धावत आहेत. भुवनेश्वर-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस 3 तास, सिकंदराबाद-निजामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस 3 तास, हावडा नवी दिल्ली पूर्व एक्सप्रेस 3 तास, प्रयागराज-नवी दिल्ली 3 तास, भागलपूर-आनंद विहार टर्मिनल एक्सप्रेस 3 तास उशिरानं धावत आहे. यासह इतर रेल्वे सेवांवरही परिणाम होत आहे.
- धुक्यामुळं सिग्नल दिसत नाही : दिल्लीला एक तास उशिरा पोहोचणार्या गाड्यांना परत जाण्यास उशीर होतो. अशा परिस्थितीत प्रवाशांना रेल्वेची वाट पाहावी लागते. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, धुक्यामुळं रेल्वेचे लोको पायलट सिग्नल पाहू शकत नाही. रेल्वे अपघात टाळण्यासाठी लोको पायलटला सिग्नल पाहूनच ट्रेन चालवावी लागते. अशा परिस्थितीत रेल्वे उशीरा येते.
हेही वाचा :