मुंबई - रमझान ईदच्या पूर्वसंध्येला अभिनेता सलमान खानला एक मोठा धक्का बसला आहे. अभिनेता सलमान खानला मानहानिच्या दाव्याखाली कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामध्ये 295 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. केतन आर. कक्कड यांनी ही नोटीस बजावली आहे. बॉम्बे सिटी सिव्हिल कोर्टाचे न्यायाधीश ए.एच. लद्दड यांनी कक्कड यांच्या विरोधात खान यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात अंतरिम सवलतीच्या नोटीसमध्ये आदेश दिल्यानंतर ही घटना घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कक्कड यांनी वकिलामार्फत ही नोटीस पाठवली आहे. याला एका आठवड्या प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या एका हप्त्यात सलमानच्या वकिलांकडून कोणताही प्रतिसा देण्यात आला नाही. दरम्यान, दुसऱ्या बाजूला, सलमान खान एक अतिशय श्रीमंत, जगप्रसिद्ध आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत शक्तिशाली व्यक्तिमत्त्व आहे. तो आम्हाला माफी मागण्यासाठी भाग पाडत आहे. तसेच, रायगडावरील आमची जमीन बेकायदेशीरपणे बळकावणे आणि आम्हाला कायमचे भारताबाहेर घालवणे असे त्यांचे प्रयत्न आहेत असही ते म्हणाले आहेत.
काय झाले होते - पनवेल फॉर्महाऊसच्या शेजाऱ्यासोबत चाललेला वाद अभिनेत्याला भारी पडण्याची चिन्ह दिसत आहेत. या प्रकरणात सुरु असलेल्या केसमुळे आता सलमानच्या अडचणी वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. (Salaman Khan Panvel farmhouse) केतन कक्कड या शेजाऱ्याने जमिनीसंदर्भात सलमानवर जे आरोप केले होते त्यामध्ये तथ्य असल्याचे मुंबईच्या सिव्हिल कोर्टाने हे मान्य केले आहे. त्याचा कुठलाही आरोप खोटा नाही. त्यामुळे कोर्टाने सलमानने शेजाऱ्याविरोधात केलेल्या मानहानीच्या दाव्याला रद्दबातल केले आहे.
जमिनीच्या प्लॉटवर येण्यास मनाई केली - सलमानने दावा केला होता की, हे आरोप त्याची फक्त माझी बदनामी करण्यासाठी केले जात आहेत. परंतु, कोर्टाने केतनने जे पुरावे सादर केले होते त्यांच्या आधारावर सलमानचे म्हणणे खोटे होते असे मान्य केले आहे. (Injunction Application) सलमानचा शेजारी तक्रारदार केतनने सलमानविरोधात जमिनीसंदर्भातले पुरावे सादर करताना म्हटले होते, की त्याला जमिनीच्या प्लॉटवर येण्यास मनाई केली आहे.
सलमान खान स्वतःची बाजू पूर्णपणे मांडण्यात अयशस्वी - मुंबई सेशन कोर्टाचे न्यायाधीश ए.एच. लद्दाद म्हणाले, की सलमान खान स्वतःची बाजू पूर्णपणे मांडण्यात अयशस्वी ठरला आहे. ती जमिन सलमाननचीच आहे हे त्याला पूर्ण सिद्ध करता आले नाही. कक्कडने मात्र जे पुरावे सादर केले ते त्याच्या म्हणण्याला खरे ठरवत आहेत. (Salman Khan Defamation Case) त्याचसोबत सलमानने त्याचा शेजारी केतन कक्क्डविरोधात कोर्टाकडे 'न्यायालयीन मनाई हुकूम'साठी परवानगी मागितली होती त्यालादेखील कोर्टाने रद्द केले आहे.
हेही वाचा - Salman Khan Neighbor Case : सलमानचा शेजाऱ्याविरोधातील मानहानीचा दावा कोर्टाने फेटाळला