नवी दिल्ली Demand Of Team Bharat : इंडियाचं नामकरण भारत करण्याची मोहीम आता जोर धरत आहे. यासंदर्भात विरोधक सत्ताधाऱ्यांध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलंय. तर दुसरीकडं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते इंडियाऐवजी भारत नावाला समर्थन देताना दिसत आहेत. काँग्रेससह इतर विरोधी पक्ष यावरून भाजपा सरकारला धारेवर धरत आहेत. अशातच माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनंही याबाबत 'X' वर (पूर्वीचं ट्विटर) आपलं मत व्यक्त केलंय. त्यानं जर्सीवर टीम इंडियाच्या नावाऐवजी टीम भारत असं लिहिण्याची सूचना केलीय. वर्ल्डकप खेळण्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर त्यानं आपली प्रतिक्रिया लिहिली आहे. तसंच त्यानं खेळाडूंच्या जर्सीवर देखील टीम भारत लिहावं असं म्हटलं आहे. (Team India Nahi Bharat)
-
Team India nahin #TeamBharat.
— Virender Sehwag (@virendersehwag) September 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
This World Cup as we cheer for Kohli , Rohit , Bumrah, Jaddu , may we have Bharat in our hearts and the players wear jersey which has “Bharat” @JayShah . https://t.co/LWQjjTB98Z
">Team India nahin #TeamBharat.
— Virender Sehwag (@virendersehwag) September 5, 2023
This World Cup as we cheer for Kohli , Rohit , Bumrah, Jaddu , may we have Bharat in our hearts and the players wear jersey which has “Bharat” @JayShah . https://t.co/LWQjjTB98ZTeam India nahin #TeamBharat.
— Virender Sehwag (@virendersehwag) September 5, 2023
This World Cup as we cheer for Kohli , Rohit , Bumrah, Jaddu , may we have Bharat in our hearts and the players wear jersey which has “Bharat” @JayShah . https://t.co/LWQjjTB98Z
मला राजकारणात अजिबात रस नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये दोन्ही प्रमुख पक्षांनी माझ्याशी संपर्क साधला होता. माझं असं मत आहे, की बहुतेक मनोरंजन करणार्यांनी किंवा खेळाडूंनी राजकारणात येऊ नये. कारण बहुतेक लोक त्यांचा अहंकार, सत्तेची भूक भागवतात. अशा लोकांना सामान्य लोकांसाठी खरा वेळ मिळत नाही, त्याला काही अपवाद आहेत. पण साधारणपणे बहुतेक फक्त PR करतात. मला क्रिकेटमध्ये गुंतून राहणे, क्रिकेटचं समालोचन करणं आवडतं. त्यामुळं मला माझ्या सोयीनुसार अर्धवेळ खासदार होण्याची इच्छा नाही. - विरेंद्र सेहवाग, माजी क्रिकेटपटू
खेळाडूंच्या जर्सीवर टीम भारत लिहावं : वर्ल्ड कप खेळण्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर वीरेंद्र सेहवागनं सोशल मीडिया साईट 'X' वर लिहिलं की, आपण टीम इंडिया नाही, तर टीम भारत असं लिहायला हवं. आमच्या खेळाडूच्या जर्सीवरही भारत लिहिण्याची गरज असल्याचं त्यानं म्हटलं आहे. ही पोस्ट त्यानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनाही टॅग केली आहे.(Virender Sehwag Wants Bharat)
दोन्ही राजकीय पक्षांनी दिली होती ऑफर : याशिवाय सेहवागनं राजकारणात येण्याच्या शक्यतेबाबत आपलं मत मांडलंय. मला राजकारणात यायला आजिबात आवडत नसल्याचं त्यानं स्पष्टपणे सांगितलंय. त्याला फक्त क्रिकेटशीच कनेक्ट राहायला आवडेल असं देखील म्हटलं आहे. मला अर्धवेळ खासदार व्हायचं नाही, माझं क्रिकेटवर प्रेम आहे. त्याच्याशीच मला कनेक्ट राहण्याची इच्छा असल्याचं त्यानं पूर्वीच्या ट्विटरवर म्हटलंय. गेल्या निवडणुकीत दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्याशी संपर्क साधत राजकारणाची ऑफर दिल्याचा दावा सेहवागनं आपल्या पोस्टमध्ये केलाय. (India Va Bharat 'X' Post)
हेही वाचा -