ETV Bharat / bharat

दिल्ली हिंसाचार : 20 आरोपींची छायाचित्रे दिल्ली पोलिसांकडून प्रसिद्ध

author img

By

Published : Nov 27, 2020, 3:21 PM IST

दिल्ली हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत तब्बल 700पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दंगल पेटवणाऱ्या आरोपींची ओळख पटवण्यासाठी मतदान कार्ड आणि चालक परवान्याचा वापर करण्यात येत आहे. आरोपींना पकडण्यासाठी 40पेक्षा अधिक दल स्थापन करण्यात आली.

दिल्ली हिंसा
दिल्ली हिंसा

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून राजधानी दिल्लीमध्ये हिंसाचार झाला. यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दिल्ली गुन्हे शाखा पोलिसांनी आंदोलनादरम्यान हिंसा करणाऱ्या 20 जणांची छायाचित्रे जारी केली आहेत. संबधित संशयितांना सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोधल्याचे पोलिसांनी सांगितले. माध्यमे आणि लोकांच्या मदतीने अनेक व्हिडिओ मिळाले असून आरोपींची ओळख पटवण्यास या व्हिडिओंची मदत होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दिल्ली गुन्हे शाखेने जारी केलेली ही छायाचित्रे ईशान्य दिल्लीतील चाँद बागमध्ये हिंसा करणाऱ्यांची आहेत. आरोपींबद्दल माहिती दिल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल आणि त्याला बक्षीसही देण्यात येईल, असे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे. या सर्व जणांचा 24 फेब्रुवरीला झालेल्या हिंसाचारात सहभाग आहे. दिल्ली हिंसाचारामध्ये हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांची हत्या करण्यात आली होती.

40पेक्षा अधिक दलांची स्थापना -

दिल्ली हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत तब्बल 700पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दंगल पेटवणाऱ्या आरोपींची ओळख पटवण्यासाठी मतदान कार्ड आणि चालक परवान्याचा वापर करण्यात येत आहे. आरोपींना पकडण्यासाठी 40पेक्षा अधिक दल स्थापन करण्यात आली.

दिल्ली हिंसाचार -

24 फेब्रुवारीला सीएए समर्थक आणि आणि विरोधकांमध्ये झालेल्या दंगलीने लवकरच भीषण स्वरूप धारण केले होते. यानंतर तीन दिवस ईशान्य दिल्लीमध्ये हिंसाचार सुरू होता. या सर्व प्रकरणाचा तपास करण्यासाठी, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने दोन विशेष पथके तैनात केली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.