ETV Bharat / bharat

दिल्लीत हुडहुडी! कडाक्याच्या थंडीमुळं पाचवीपर्यंतच्या शाळा पुढील पाच दिवस बंद

author img

By ANI

Published : Jan 7, 2024, 1:06 PM IST

Schools closed due to cold : दिल्लीमध्ये इयत्ता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील पाच दिवस सुट्टी घोषित करण्यात आलीय. वाढती थंडी आणि धुक्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांनी याबाबत माहिती दिली.

due to amid cold weather conditions  schools up to class 5 in delhi to remain closed for next 5 days
दिल्लीत हुडहुडी! कडाक्याच्या थंडीमुळं पाचवीपर्यंतच्या शाळा पुढील पाच दिवस बंद

नवी दिल्ली Schools closed due to cold : राजधानीत सध्या प्रचंड थंडी आहे, त्यामुळं दिल्लीतील पाचवी पर्यंतच्या शाळा पुढील पाच दिवस बंद राहणार आहेत. दिल्ली सरकारमधील शिक्षणमंत्री आतिशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही माहिती दिलीय.

आदेश मागे घेण्यात आला : तत्पूर्वी शनिवारी (6 जानेवारी) दिल्लीतील थंडीची लाट आणि धुक्याची स्थिती पाहता शिक्षण मंत्रालयानं 10 जानेवारीपर्यंत सरकारी आणि निमसरकारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र तासाभरानंतर हा आदेश मागे घेण्यात आला. काही अनियमिततेमुळं हा आदेश मागे घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती. तसंच यासंदर्भातील पुढील आदेश रविवारी काढण्यात येणार आहेत.

  • Schools in Delhi will remain closed for the next 5 days due to the prevailing cold weather conditions, for students from Nursery to Class 5.

    — Atishi (@AtishiAAP) January 7, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नव्या आदेशात काय म्हंटलंय : दिल्लीच्या शिक्षणमंत्री आतिशी यांनी दिलेल्या नव्या आदेशानुसार दिल्लीतील नर्सरी पासून पाचवी पर्यंतच्या शाळा पुढील पाच दिवस बंद राहणार आहेत. याचाच अर्थ सोमवारपासून केवळ सहावीपासून पुढचे वर्ग सुरू होणार आहेत.

हवामान खात्याने केला यलो अलर्ट जारी : दरम्यान, मागील काही दिवसांपासून दिल्लीत थंडीची लाट आणि धुके पाहायला मिळत आहे. याबाबत हवामान खात्याने यलो अलर्टही जारी केला आहे. रविवारी (7 जानेवारी) सकाळी दिल्लीचे तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. याशिवाय 9 जानेवारी रोजी दिल्लीत हलक्या रिमझिम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. या हवामान अंदाजामुळं पाचवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

उत्तर भारतात थंडीचा पारा घसरला : दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारत कडाक्याच्या थंडीत आणि दाट धुक्यात हरवलंय. दाट धुक्यामुळं अनेक भागांमध्ये दृश्यमानता शून्यावर पोहोचली. गुरुवारी (4 जानेवारी) दिल्ली, एनसीआर, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये दाट धुके पसरले होते. त्यामुळं अनेक विमान उड्डाणे वळवण्यात आली होती. तसंच याचा परिणाम अनेक रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर झाल्याचं बघायला मिळालं.

हेही वाचा -

Cold Weather in Satara : साताऱ्यात थंडीचा कडाका कायम, धुके आणि वाफांमुळे नद्या गोठल्याचा भास, पाहा व्हिडिओ

World Famous Har Ki Pauri : जगप्रसिद्ध हर की पैरी धुक्यात हरवली, पहा हा व्हिडिओ

उत्तर प्रदेशात धुक्याचं साम्राज्य; विमान उड्डाणास अडथळा, अनेक विमानं रद्द तर काही विमान उड्डाणाला उशीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.