नवी दिल्ली Fog Effect on Flights and Train : राजधानी दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी धुक्यानं कहर केलाय. याचा सर्वात मोठा परिणाम विमान उड्डाणांवरच नाही तर रेल्वे वाहतूक आणि रस्त्यांवरही दिसून आलाय. फॉग लाइट लावल्याशिवाय वाहनांना रस्त्यावरुन जाणं अशक्य झाले आहे. आज दिल्लीतील दोन वेगवेगळ्या भागात नोंदलेली दृश्यमानताही खूपच कमी आहे. सकाळी पालममध्ये 50 मीटर आणि सफदरजंगमध्ये 125 मीटरपर्यंत दृश्यमानता नोंदवण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 30 हून अधिक उड्डाणं प्रभावित झाली आहेत.
धुक्यामुळं 11 विमानांची दिशा बदलली : विमानतळ आणि आजूबाजूचा परिसर दाट धुक्याच्या चादरीत झाकल्याचं पाहायला मिळालंय. जसजसा दिवस पुढं जाईल तसतशी परिस्थिती सुधारेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या परिस्थितीत दुपारी 12 नंतर सुधारणा होण्याची शक्यता आहे. मंगळवारीही धुक्यामुळं 30 हवाई उड्डाणांवर परिणाम झाला होती. दाट धुक्यामुळं 11 फ्लाइट जयपूर आणि एक फ्लाइट लखनऊला वळवण्यात आलीय. दुपारी 12 वाजल्यानंतर ही सर्व उड्डाणं पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आली होती.
सोमवारीही विमानसेवा विस्कळीत : त्यापूर्वी सोमवारीही 125 उड्डाणं प्रभावित झाली होती. सोमवारी पालम आणि सफदरजंग इथं दृश्यमानता केवळ 0-0 नोंदवली गेली होती. ज्यामुळं विमानाला 2 तास ते 8 तास उशीर झाला. बाहेरुन येणारी उड्डाणं जवळच्या विमानतळांवर वळवण्यात आली आणि तासांच्या प्रतीक्षेनंतर दिल्लीच्या इंदिरा गांधी आतरराष्ट्रीय विमानतळावरुन विमानानं उड्डाण केलं होतं. सकाळी कमी दृश्यमानता असल्यानं उड्डाण करण्यात अडचण येत होती.
दररोज दीड हजार उड्डाणं : दिल्ली विमानतळावर दररोज सुमारे दीड हजार उड्डाणे टेक ऑफ आणि लँड होतात. तसंच दररोज दीड ते दोन लाख प्रवासी विमानानं ये-जा करतात. धुक्याचा सामना करण्यासाठी अनेक व्यवस्था करण्यात आल्या असल्या, तरी जेव्हा दृश्यमानता खूपच कमी असते, तेव्हा प्रत्येक वेळी उड्डाणांवर परिणाम होतो. त्याचा प्रभाव 28 डिसेंबरपर्यंत कायम राहणार असल्याचंही हवामान खात्यानं म्हटलंय.
- रेल्वे सेवांवरही विस्कळीत : या धुक्यांचा परिणाम रेल्वे सेवांवरही झाल्याचं दिसून आलंय. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरुन जाणाऱ्या व येणाऱ्या अनेक रेल्वे उशिरा धावत आहेत. तर काही रेल्वे रद्दही करण्यात आल्या आहेत. यामुळं नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. उत्तर भारतात दाट धुकं पडल्यानं सिग्नल दिसण्यात अडचणी येतात, त्यामुळं अनेक रेल्वे उशिरा धावत आहेत.
हेही वाचा :