नवी दिल्ली - सोशल मीडियावर सध्या चर्चेत असणारं आणि वादग्रस्त बुली बाई अॅप (Bulli Bai App) प्रकरणातील मुख्य आरोपी नीरज बिष्णोईचा अटक ( Bulli Bai app case Main conspirator ) जामीन अर्ज दिल्ली न्यायालयाने ( Delhi Court rejects bail plea of Niraj Bishnoi ) फेटाळला आहे. दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ या स्पेशल सेलनं निरजला आसाममधून अटक केली होती. यापूर्वी, विशाल झा, श्वेता सिंग, मयंक रावल आणि निरज बिश्नोई यांना GitHub अॅपमध्ये महत्वाच्या भूमिकेसाठी अटक करण्यात आली होती.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी निरज बिश्नोईचा जामीन अर्ज फेटाळून लावला. गुन्ह्याचे स्वरूप, आरोपांचे गांभीर्य आणि तपासाचा प्रारंभिक टप्पा लक्षात घेता, मला अर्जात कोणतीही योग्यता आढळत नाही, असे अर्ज फेटाळताना म्हणाले. आरोपी यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचे निरक्षण न्यायालयाने नोंदवले.
कोण आहे नीरज?
नीरज बिष्णोई असे या मुख्य आरोपीचे पूर्ण नाव असून तो 20 वर्षाचा आहे. आसामच्या जोरहाटमधील दिगंबर भागातील तो रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तर भोपाळमधील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये तो बीटेकचे शिक्षण घेत आहे.
काय आहे बुली बाई अॅप?
बुली बाई ( Bulli Bai App ) या अॅपवर हजारो मुस्लिम महिलांचा लिलाव केला जात होता. कथितपणे मुस्लिम महिलांना टार्गेट केले जात होते. बुली बाई अॅप मुस्लिम महिलांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरुन त्यांचे फोटो डाऊनलोड करुन लिलावासाठी पोस्ट असल्याचा आरोप आहे. अॅपची माहिती समोर येताच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उद्रेक पहायला मिळाला. या अॅपमुळे मुस्लिमांमध्ये संतापाचं वातावरण आहे.