नवी दिल्ली - भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा यांना पंजाब पोलिसांनी ( Tajinder Bagga Arrested ) अटक केली होती. त्यानंतर आता त्यांचा ताबा पुन्हा दिल्ली पोलिसांकडे देण्यात आला आहे. पोलीस बग्गांना घेऊन दिल्लीकडे रवाना झाले ( Tajinder Bagga Back To Delhi ) आहे.
यापूर्वी अटकेसाठी पंजाब पोलीस आले होते - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर दिल्ली भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा यांच्या विरोधात पंजाबमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ( Punjab Police ) त्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलीस यापूर्वी त्यांच्या अटकेसाठी आले होते असही यावेळी म्हटले आहे.
अरविंद केजरीवालांना धमकवल्याप्रकरणी गुन्हा - बग्गा यांच्याविरोधात १ एप्रिल रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. पंजाब पोलिसांनी प्रक्षोभक विधाने करणे, शत्रुत्वाला प्रोत्साहन देणे आणि गुन्हेगारी धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ( Tajinder Bagga Arrested ) यासोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटावरील वक्तव्यावर दिल्ली भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा यांनीही हल्लाबोल केला होता, त्यावरून ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.
-
BJP leader Tajinder Pal Bagga being brought back to Delhi by Delhi Police.
— ANI (@ANI) May 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Bagga was arrested by Punjab Police earlier today from Delhi. https://t.co/s8qU5D7hUb pic.twitter.com/4wgURQ3K13
">BJP leader Tajinder Pal Bagga being brought back to Delhi by Delhi Police.
— ANI (@ANI) May 6, 2022
Bagga was arrested by Punjab Police earlier today from Delhi. https://t.co/s8qU5D7hUb pic.twitter.com/4wgURQ3K13BJP leader Tajinder Pal Bagga being brought back to Delhi by Delhi Police.
— ANI (@ANI) May 6, 2022
Bagga was arrested by Punjab Police earlier today from Delhi. https://t.co/s8qU5D7hUb pic.twitter.com/4wgURQ3K13
एफआयआरमध्ये बग्गा यांच्या वक्तव्याचा उल्लेख - ३० मार्च रोजी दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप युवा मोर्चाच्या निदर्शनादरम्यान केजरीवाल यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख आहे. भाजप युवा मोर्चाच्या नेत्याने दावा केला होता की पंजाब पोलिसांची एक टीम त्यांना अटक करण्यासाठी राजधानीत त्याच्या घरी पोहोचली होती. परंतु, त्यांना त्यांच्याविरुद्ध कोणत्याही एफआयआरची माहिती नव्हती.
-
#WATCH | Team of Delhi Police leaves with BJP leader Tajinder Pal Singh Bagga from Thanesar Sadar Police station in Haryana's Kurukshetra
— ANI (@ANI) May 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Bagga was arrested by Punjab Police today from Delhi. pic.twitter.com/rAn21Z24p5
">#WATCH | Team of Delhi Police leaves with BJP leader Tajinder Pal Singh Bagga from Thanesar Sadar Police station in Haryana's Kurukshetra
— ANI (@ANI) May 6, 2022
Bagga was arrested by Punjab Police today from Delhi. pic.twitter.com/rAn21Z24p5#WATCH | Team of Delhi Police leaves with BJP leader Tajinder Pal Singh Bagga from Thanesar Sadar Police station in Haryana's Kurukshetra
— ANI (@ANI) May 6, 2022
Bagga was arrested by Punjab Police today from Delhi. pic.twitter.com/rAn21Z24p5
दिल्ली भाजपमध्ये अस्थिरकतेचे वातावरण - या संपूर्ण प्रकरणाबाबत डीसीपी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच, पंजाब पोलिसांनी बग्गा यांना अटक करण्यापासून रोखल्याचीही माहिती नाही. बग्गा यांच्या अटकेच्या बातमीने दिल्ली भाजपमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
-
BJP leader Tajinder Pal Singh Bagga arrested by Punjab Police: Aam Aadmi Party MLA Naresh Balyan pic.twitter.com/ibrebvNCeU
— ANI (@ANI) May 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BJP leader Tajinder Pal Singh Bagga arrested by Punjab Police: Aam Aadmi Party MLA Naresh Balyan pic.twitter.com/ibrebvNCeU
— ANI (@ANI) May 6, 2022BJP leader Tajinder Pal Singh Bagga arrested by Punjab Police: Aam Aadmi Party MLA Naresh Balyan pic.twitter.com/ibrebvNCeU
— ANI (@ANI) May 6, 2022
पंजाब हरयाणा पोलीस आमनेसामने - तजिंदर बग्गा यांच्या अटकेवरुन हरयाणा आणि पंजाब पोलीस आमनेसामने आले आहेत. दिल्लीतून अटक केल्यानंतर पंजाब मध्ये घेऊन जात असताना पोलिसांना हरयाणातील कुरुक्षेत्रात अडवण्यात आले आहे. त्यानंतर कुरुक्षेत्र पोलिसांनी एसएसपींना पत्र लिहून बग्गांचे अपहरण झाले नसून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती दिली आहे. या पत्राची प्रत हरयाणाच्या डीजीपींना पाठवण्यात आली आहे. याप्रकरणी आता पंजाब पोलीस उच्च न्यायालयात जाणार आहे.
पंजाब पोलिसांवर अपहरणाचा गुन्हा - पंजाब पोलिसांनी बग्गांना अटक केल्यानंतर दिल्लीत भाजपने पंजाब पोलिसांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर हरयाणा पोलिसांनी तजिंदर बग्गा यांना घेऊन जाणाऱ्या पंजाब पोलिसांच्या पथकाला रोखले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुरुक्षेत्र पोलीस चौकशीसाठी थांबले आहेत. पंजाब पोलिसांचे वाहन कुरुक्षेत्रात ठेवण्यात आले आहे. कुरुक्षेत्र, कर्नाल, अंबाला येथील पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर आहेत.
हेही वाचा - Mimicry Artist Shyam Rangeela : नक्कलकार शाम रंगीलाचा 'आप'मध्ये प्रवेश