ETV Bharat / bharat

Delhi Accident : ब्रेक फेल झाल्यामुळे थार कारने ७ जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू - 2 dies in vasant vihar

होळीच्या रात्री बुधवारी ( दि.9 तारखेला ) दिल्लीत मोठी दुर्घटना घडली. वेगवान थारचा ब्रेक फेल झाल्याने तिने 7 जणांना चिरडले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Delhi Accident
ब्रेक फेल झाल्यामुळे थार कारने ७ जणांना चिरडले
author img

By

Published : Mar 9, 2023, 7:37 AM IST

नवी दिल्ली : दिल्लीत बुधवारी ( दि.8 तारखेला ) मोठी दुर्घटना घडली आहे. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास दक्षिण दिल्लीतील वसंत विहार परिसरात हायस्पीड थारने रस्त्यावरील फेरीवाले आणि विक्रेत्यांना चिरडले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ५ जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे.

  • दिल्ली के मलाई मंदिर इलाके में तेज रफ्तार थार ने कई लोगों को कुचल दिया। हादसे में 5 से ज्यादा लोग घायल हुए हैं। थार ने 2 गाड़ियों को भी टक्कर मारी है। शुरूआती जांच में सामने आया है कि गाड़ी की स्पीड ज्यादा थी और संतुलन बिगड़ने के कारण हादसा हुआ। जांच जारी है: दिल्ली पुलिस pic.twitter.com/IqWnWyXKlO

    — ANI_HindiNews (@AHindinews) March 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मलाई मंदिराजवळची घटना : वसंत विहार येथील मलाई मंदिराजवळ ही घटना घडली. भरधाव वेगात आलेल्या थारने दुकानदारांना चिरडले. दोन कारला धडक दिली. यामध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या लोकांनी सगळी घटना डोळ्यांनी पाहीली. हा अपघात इतका भीषण होता की, यात दोन कारचेही नुकसान झाले आहे. अपघाताचे कारण समोर आले आहे. गाडीचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात होताच आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांसोबतच नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.

धडक बसलेले लोक गंभीर जखमी : या अपघातात जखमी झालेल्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, थार कार भरधाव वेगात आली आणि आधी कार खांबाला धडकली. त्यानंतर ते अनियंत्रित झाले आणि रस्त्यावर फळे विक्रेत्यांना चिरडले. त्याचवेळी, अपघातानंतर कार अनेक वेळा उलटली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कारची धडक बसलेले लोक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे. दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनेचा आढावा घेताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, वेगवान थारने मलाई मंदिराजवळ अनेकांना चिरडले. यामध्ये ५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. थारमध्ये 2 प्रवाशांनाही दुखापत झाली आहे. वाहनाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सध्या अपघाताचा तपास सुरू आहे.

हेही वाचा : Shimla Accident: शिमल्यात मोठा अपघात.. २०० फूट खोल दरीत पडली गाडी.. चौघे जागीच ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.