ETV Bharat / bharat

ट्रॅक्टर रॅली हिंसाचार : पंजाबी अभिनेता दीप सिधूला अटक - दीप सिधू अटक

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी अभिनेता दीप सिधूला अटक केली आहे.

दीप सिधू
दीप सिधू
author img

By

Published : Feb 9, 2021, 9:57 AM IST

Updated : Feb 9, 2021, 10:24 AM IST

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी अभिनेता दीप सिधूला अटक केली आहे. लाल किल्ल्यावर आंदोलकांनी धार्मिक झेंडा फडकावला होता. त्यास दीप सिधू जबाबदार असल्याचा आरोप आहे. २६ जानेवारीनंतर तो फरार होता. पोलिसांनी त्याच्यावर १ लाख इनाम ठेवला होता. सुमारे १५ दिवसानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

लाल किल्ल्यावर हिंसाचाराचा आरोप -

लाल किल्ल्यावर आंदोलकांनी ताबा मिळवला तेव्हा दीप सिधूने फेसबुक लाईव्हही केले होते. त्यानंतर त्याचे नाव चर्चेत आले होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दीप सिधूला ताब्यात घेतले आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती. त्यात हिंसाचार झाला होता. नियोजित मार्गावरून ट्रॅक्टर रॅली सुरू होती. मात्र, दीप सिधूने भडकावल्याने आंदोलकांनी लाल किल्ल्याकडे मोर्चा वळवला. लाल किल्ल्यावर आंदोलक जाण्यास दीप सिधूच जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. यावेळी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर निशाण साहिब हा धार्मिक ध्वज फडकावला होता. या आंदोलकांच्या घोळक्यात दीप सिधूही होता.

लाल किल्ल्याचा मिळवला होता ताबा -

लाल किल्ल्यावर ताबा घेतल्यानंतर आंदोलकांनी तेथे तोडफोड केली. तसेच पोलिसांवरही हल्ला केला. किल्ल्याच्या परिसरात ट्रॅक्टर फिरवत धुडगूस घातला होता. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आत्तापर्यंत पोलिसांनी शेकडो आंदोलकांना हिंसाचार केल्याप्रकरणी ताब्यात घेतले असून अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, दीप सिधू पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

शेतकरी नेत्यांनी केला आरोप -

दीप सिधूला आंदोलनात हिंसाचार घडवण्यासाठी जाणूनबुजून भाजपानेच घुसवल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता. दीप सिधू हा भाजपाचा एजंट असून त्याला आंदोलन बदनाम करण्यासाठी भाजपानेच घुसरल्याचे शेतकरी नेते म्हणाले होते. दरम्यान, अनेक भाजप नेत्यांनीही दीप सिधूशी संबध नसल्याचे जाहीर केले होते. पंतप्रधान मोदी, दीप सिधू आणि अभिनेता आणि खासदार सनी देओल यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता.

Last Updated : Feb 9, 2021, 10:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.