बेंगळुरू : कर्नाटक उच्च न्यायलयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. कॉलरने पाकिस्तानमधील एका बॅंक खात्यात पैशांची मागणी केली आहे. त्यामुळे सायबर पोलिसांसह संपूर्ण पोलीस खाते अलर्ट झाले आहे.
अज्ञात संशयितांविरुद्ध एफआयआर दाखल : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या प्रेस रिलेशन ऑफिसरने एक तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यांनी स्वत:सह अनेक न्यायाधीशांच्या जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी अज्ञात संशयितांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी सोमवारी सांगितले. के मुरलीधर यांनी 14 जुलै रोजी तक्रार दाखल केली आहे. त्यांना 12 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर मेसेज आले होते. हा त्यांचा अधिकृत फोन नंबर असून हा नंबर उच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे.
या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी : हा संदेश हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेत आहे. संदेशात मुरलीधर यांच्यासह न्यायमूर्ती मोहम्मद नवाज, न्यायमूर्ती एच टी नरेंद्र प्रसाद, न्यायमूर्ती अशोक जी निजगन्नावार (निवृत्त), न्यायमूर्ती एचपी संदेश, न्यायमूर्ती के नटराजन आणि न्यायमूर्ती बी वीरप्पा (निवृत्त) या उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले.
50 लाख रुपयांची खंडणी मागितली : या मेसेजमध्ये धमकीसह पाच संशयास्पद मोबाईल फोन नंबर होते. 14 जुलै रोजी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, धमकीच्या संदेशात पाकिस्तानमधील बँक खात्यात 50 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 506, 507 आणि 504 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 75 आणि 66 (एफ) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
26/11 सारख्या हल्ल्याची धमकी : गेल्या आठवड्यात मंगळवारी एका अज्ञात व्यक्तीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून धमकीचा कॉल केला होता. कॉलरने एका विशिष्ट ठिकाणी AK-47 आणि काडतुसे असल्याचे म्हटले होते. कॉलरने मुंबईमध्ये 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी आयपीसीच्या कलम 509 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :