चेन्नई - द्रमुकचे खासदार दयानिधी मारन यांनी शनिवारी कोइम्बतूरला विमानाने प्रवास केला. यावेळी त्यांना विमानाच्या आपत्कालीन गेटजवळ जागा देण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी भाजप खासदार तेजस्वी सूर्याची खिल्ली उडवली. मी आपत्कालीन दरवाजा कधीच उघडणार नाही, नाहीतर मला लिखित माफी मागावी लागेल, अशा शब्दात त्यांनी तेजस्वी सुर्याची खिल्ली उडवली होती. त्यांनी हा व्हिडिओ ट्विट करत तेजस्वी सुर्यासह इंडीगोलाही टॅग केले.
प्रवासाचा व्हिडिओ शेअर करत तेजस्वी सुर्यावर हल्लाबोल : इंडिगोच्या विमानाने शनिवारी दयानिधी मारन हे कोईम्बतूरला गेले होते. यावेळी त्यांनी या प्रवासाचा व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. दयानिधी मारन हे चेन्नई मध्य लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत कोणताही जाणकार व्यक्ती प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे दयानिधी मारन यांनी तेजस्वी सुर्या यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मला लेखी माफी मागावी लागेल : खासदार दयानिधी मारन यांनी कोईम्बतूरला जातानाचा हा व्हिडिओ शेअर करत त्यावरुन तेजस्वी सुर्यावर हल्लाबोल केला आहे. या व्हिडिओत मारन हे टि शर्ट घातलेले दिसत असून त्यांना आपात्कालीन गेटजवळ जागा दिल्याचेही दिसत आहे. यावेळी मारन यांनी वनक्कम, वाझगा तामिळनाडू. मी चेन्नईहून इंडिगोच्या फ्लाइटने कोवई (कोइम्बतूर) येथे जात आहे. मला इमर्जन्सी एक्झिटजवळ जागा देण्यात आली. मी आपत्कालीन एक्झिट उघडणार नाही. उघडल्यास मला लेखी माफी मागावी लागेल. तसेच, त्यामुळे उड्डाणाला धोका निर्माण होईल, असे मारन या व्हिडिओत दिसत आहेत.
काय आहे प्रकरण : भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या विमानाने चेन्नईवरुन तिरुचिरापल्लीला जात होते. यावेळी त्यांना विमानाच्या आपात्कालिन दरवाजाजवळ जागा देण्यात आली होती. विमानाचे क्रू उड्डाणाबाबत प्रवाशांना माहिती देत होते. तर विमान उड्डाणाच्या तयारीत होते. यावेळी भाजप खासदार तेस्वी सुर्या यांनी आपात्कालिन दरवाजा उघडल्याचा आरोप काँग्रेसच्या चेन्नईच्या खासदारांने याबाबत तक्रार केली होती. त्यामुळे तेजस्वी सुर्या यांनी चुकून दरवाजा उघडला गेल्याचे सांगितले. मात्र त्यावर त्यांना लिखित माफी मागावी लागली. त्यावर दयानिधी मारन यांनी टीका केली आहे.