ETV Bharat / bharat

Daughter Molestation : मुलीचा विनयभंग, पोलिसांच्या त्रासाला कंटाळून गावकऱ्याने केली आत्महत्या, वाचा संपूर्ण प्रकरण

author img

By

Published : Apr 5, 2023, 3:02 PM IST

पोलिसांच्या त्रासाला कंटाळून संभळ येथे एका व्यक्तीने पोलीस ठाण्यासमोर विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.

Daughter Molestation
मुलीचा विनयभंग, पोलिसांच्या त्रासाला कंटाळून गावकऱ्याने केली आत्महत्या
संभळ येथे एका व्यक्तीने पोलीस ठाण्यासमोर विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.

संभळ (उत्तर प्रदेश) : जिल्ह्यात मुलीचा विनयभंग केल्यानंतर पोलिसांच्या छळाला कंटाळून गावकऱ्याने पोलीस ठाण्यासमोर विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. गावकऱ्याच्या मृत्यूने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केल्याचा दावा केला आहे.

असा घडला प्रकार : पोलीस ठाण्यासमोर गावकऱ्याने केलेल्या आत्महत्येचे संपूर्ण प्रकरण कुडफतेहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारणी गावचे आहे. कुटुंबीयांच्या अनुपस्थितीत शेजारील तरुण अतर सिंगवर मुलीचा विनयभंग, मारहाण आणि जबरदस्तीने ओढत नेल्याचा आरोप आहे. मुलीसोबत विनयभंगाची घटना घडल्यानंतर संतप्त झालेल्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. आरोपी पक्ष आधीच पोलीस ठाण्यात पोहोचला होता, असा आरोप आहे. पोलिसांनी पीडितेला आणि तिच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्याची धमकी देऊन अत्याचार करण्यास सुरुवात केली. यादरम्यान पोलीस ठाण्यात तासन्‌तास पोलिसांची मनमानी सुरूच होती. त्यामुळे दुखावलेल्या मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यासमोरच विषारी द्रव्य प्राशन केले आणि त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी तडकाफडकी गुन्हा दाखल केला : गावकऱ्याच्या मृत्यूनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. घाईघाईत पोलिसांनी गावकऱ्याला जिल्हा संयुक्त रुग्णालयात पाठवले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गावकऱ्याच्या मृत्यूने कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचवेळी पोलिसांनी तडकाफडकी गुन्हा दाखल केला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीश चंद्र यांनी सांगितले की, कुडफतेहगढ पोलिस स्टेशन परिसरात एकाच समाजातील दोन कुटुंबांमध्ये भांडण झाले. यानंतर दोन्ही पक्ष पोलिस ठाण्यात पोहोचले. तहरीरच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील अतरसिंग आणि जगतपाल यांनी मुलीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याने मुलीच्या वडिलांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे या घटनेपासून कुटुंबात हळहळ व्यक्त होत असतानाच गावात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : Nagpur Crime: एकाच रात्री खुनाच्या दोन घटना, नागपूर शहर हादरले!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.