अल्मोडा (उत्तराखंड ) : भिकियासैन जिल्ह्यातील भिकियासैन Bhikiyasain dalit leader killing uttarakhand येथे सवर्ण मुलीशी लग्न केल्यानंतर सासरच्यांनी दलित तरुणाची हत्या dalit youth killing marrying upper case girl केली. या घटनेने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक uttarakhand police arrested dalit youth killer केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी राणीखेत येथे पाठवण्यात आला आहे. मृत तरुण हा उत्तराखंड परिवर्तन पक्षाचा नेता Uttarakhand Parivartan Party leader होता.
मुलीने दलित तरुणासी लग्न केल्याने संताप अनावर : सल्ट भागातील पानुवाधोखान येथील रहिवासी जगदीश आणि भिकियासैन येथील गीता उर्फ गुड्डी यांचा 21 ऑगस्ट रोजी गरड मंदिरात प्रेमविवाह झाला होता. लग्नापूर्वी गुड्डी तिचे सावत्र वडील जोगा सिंग आणि सावत्र भाऊ गोविंद सिंग यांच्यासोबत राहत होती. एका दलिताशी लग्न केल्याने तिच्या सावत्र भावाला आणि वडिलांना ते आवडले नाही आणि त्यांनी मिळून जगदीशची हत्या केल्याचा आरोप आहे. जगदीश यांनी उत्तराखंड परिवर्तन पार्टीकडून 2022 मध्ये सल्ट मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.
मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांनी मागितले होते संरक्षण : उत्तराखंड परिवर्तन पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष पीसी तिवारी यांनी सांगितले की, एका दलिताशी लग्न झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या कुटुंबातील सदस्य तिच्या पतीच्या जीवाचे शत्रू झाले होते. त्यामुळे मुलाकडील लोकांनी 27 ऑगस्ट रोजी जिल्हा दंडाधिकारी आणि अल्मोडाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांना त्यांच्या जीविताच्या आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी अर्ज दिला होता. अर्ज सादर करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. गुरुवारी जगदीशच्या सासऱ्यांनी जगदीश चंद्राला भिकियासैन येथे पकडले होते. त्यानंतर त्यांनी जगदीश चंद्राचे कारमधून अपहरण केले. त्यानंतर त्यांनी जगदीशची निर्घृण हत्या केली. माहिती मिळताच पोलीस व महसूल पथकाने सायंकाळी उशिरा वाहनातून जगदीशचा रक्तबंबाळ मृतदेह बाहेर काढला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे भिकियासैन तहसीलदार निशा राणी यांनी सांगितले. आरोपींना पकडण्यात आले आहे.
हेही वाचा : Senior Citizen Crime Ratio : राज्यात ज्येष्ठ नागरिकांसोबत घडलेल्या गुन्ह्यांची संख्या 6 हजार पार, NCRB च्या अहवालातून खुलासा