उत्तर प्रदेश (कुशीनगर) : जिल्ह्यातील विष्णुपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या एका मतिमंद अल्पवयीन मुलाला हैदराबादमध्ये काही लोकांनी ञास दिला. मुलाच्या नातेवाईकाकांच्या म्हणण्यानुसार, हैदराबादमध्ये काही बदमाशांनी मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फटाका फोडला ( Burst Crackers ) आहे.
फटाक्याच्या स्फोटात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. इतक्यात बदमाषांनी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. कुशीनगर येथील कुबेरपूर पोलीस ठाण्यात आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मुलाच्या आईने सांगितले की, तिचा मुलगा दिव्यांग आहे. गावातील काही लोकांनी त्याला 3 महिन्यांपूर्वी हैदराबाद येथे कामावर नेले. पीडित मुलगा हैदराबाद जिल्ह्यातील बासुरगडी गावात कामावर गेला होता. काही दिवसांपूर्वी गुंडांनी तिच्या मुलासोबत दुष्कृत्य केले होते. मुलाने ही माहिती आपल्या आईला फोनवरून सांगितली होती.
या घटनेबाबत विष्णुपुराचे एसएचओ रामचंद्र राम यांनी सांगितले की, हे प्रकरण हैदराबादचे आहे. मुलाच्या कुटुंबीयांकडून तक्रार प्राप्त झाली असून, त्यामध्ये अल्पवयीन मुलासोबत झालेल्या घटनेप्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पीडित मुलगा गावातील लोकांसह काँक्रीट प्लांटमध्ये कामाला गेला होता, अशी माहिती मिळाली आहे. हैदराबाद येथील स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.