ETV Bharat / bharat

Cyclone Sitrang: आधीच पावसाचा कहर, यातच ऐन दिवाळीत चक्रीवादळाचा धोका.. - ओडिशा किनारपट्टी

Cyclone Sitrang: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत आहे, जे रविवारी 23 ऑक्टोबर रोजी उशिरा ओडिशाच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारतीय मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट (IMD) उत्तर अंदमान समुद्रावरील हवामान प्रणालीवर लक्ष ठेवत आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ४९ किमीपर्यंत राहू शकतो. Cyclone Sitrang Likely To Skirt Odisha Coast

Cyclone Sitrang Likely To Skirt Odisha Coast
आधीच पाऊस अन् त्यात आता चक्रीवादळाचा धोका.. ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार वादळ
author img

By

Published : Oct 20, 2022, 4:10 PM IST

Updated : Oct 20, 2022, 4:26 PM IST

भुवनेश्वर (ओडिशा): Cyclone Sitrang: 24 ऑक्टोबरच्या सुमारास पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ 'सितारंग' पश्चिम बंगाल-बांगलादेश किनारपट्टीकडे जाण्यापूर्वी ओडिशाच्या किनारपट्टीला लागू शकते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या प्रादेशिक केंद्राने आज दिली. Cyclone Sitrang Likely To Skirt Odisha Coast

''आज तयार झालेला कमी दाब पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकण्याची आणि 22 ऑक्टोबरच्या सुमारास पूर्वमध्य आणि लगतच्या SE बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, 24 ऑक्टोबरपर्यंत ते पश्चिममध्य आणि लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर उत्तरेकडे परत येऊन चक्री वादळात तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर, ते हळूहळू उत्तर-ईशान्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि 25 ऑक्टोबर रोजी ओडिशा किनारपट्टीला लागून पश्चिम बंगाल - बांग्लादेश किनारपट्टीजवळ चक्रीवादळ पोहोचण्याची शक्यता आहे.'' हवामान कार्यालयाने ट्विट केले.

Cyclone Sitrang Likely To Skirt Odisha Coast
आधीच पाऊस अन् त्यात आता चक्रीवादळाचा धोका.. ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार वादळ

दरम्यान, ओडिशा सरकारने संभाव्य चक्रीवादळाच्या IMD च्या अंदाजानुसार सात किनारी जिल्ह्यांच्या प्रशासनाला सतर्कतेवर ठेवले आहे. गंजम, पुरी, खुर्दा, जगतसिंगपूर, केंद्रपाडा, भद्रक आणि बालासोर हे जिल्हे या चक्रीवादळाने प्रभावित होऊ शकतात. अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

हवामान विभागाने याची माहिती दिली

महाराष्ट्रावर याचा परिणाम होणार की नाही याबाबत अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.

Last Updated : Oct 20, 2022, 4:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.