ETV Bharat / bharat

Crypto Ponzi Scam : बॉलिवूड अभिनेता गोविंदाची ओडिशा पोलिसांकडून होणार चौकशी? काय आहे प्रकरण - Nirod Das

ओडिशा आर्थिक गुन्हे शाखा (EOW) करोडो रुपयांच्या क्रिप्टो-पॉन्झी घोटाळ्यात गोविंदाची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यामुळं गोंविदाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. जाणून घेऊ या काय आहे संपूर्ण प्रकरण.

Crypto Ponzi Scam
Crypto Ponzi Scam
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 9:57 PM IST

भुवनेश्वर : ओडिशा आर्थिक गुन्हे शाखा (EOW) 1 हजार कोटी रुपयांच्या ऑनलाइन क्रिप्टो पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी हिंदी चित्रपटसृष्टीतला 'डान्सिंग स्टार' गोविंदाची चौकशी करण्याची शक्यता आहे. EOW नं 'STA (सोलर टेक्नो अलायन्स) टोकन'वर चालवलेला भारतातील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आणलाय. या वर्षी ऑगस्टमध्ये भारतातले प्रमुख गुरतेज सिंग सिद्धू यांना राजस्थानमधून अटक करण्यात आली होती. EOW ने सोलर टेक्नो अलायन्सच्या ओडिशा टीमचे प्रमुख नीरोद दास यांनाही अटक केली आहे.

गोंविदाची चौकशी होण्याची शक्यता : ईओडब्ल्यूचे महानिरीक्षक जेएन पंकज यांनी माहिती दिली की, जुलैमध्ये गोव्यातील आलिशान स्टार हॉटेल (बॅन्क्वेट हॉल) येथे आयोजित एसटीएच्या मेगा इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्याची चौकशी केली जाईल. मेगा इव्हेंटमध्ये ओडिशातील अनेक लोक उपस्थित होते. तंसंच 1 हजाराहून अधिक अप-लाइन सदस्यांनी सहभाग घेतला होता. चित्रपट अभिनेता गोविंदानं एसटीएचा प्रचार करणारे काही व्हिडिओही प्रसिद्ध केले होते. घोटाळ्यातील त्याच्या सहभागाचं स्वरूप जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याचा सहभाग केवळ समर्थनापुरता मर्यादित असल्याचं आढळल्यास, आम्ही त्याचा या खटल्यात साक्षीदार म्हणून वापर करू.

लूक आऊट सर्क्युलर जारी : गोविंदाची चौकशी करण्यापूर्वी, EOW ला अशा इतर अनेक STA सदस्यांची चौकशी करावी लागेल. जे अद्याप फरार आहेत. एसटीएच्या आर्थिक आणि तांत्रिक प्रमुखासह मास्टरमाइंड गुरतेजच्या फरार प्रमुख साथीदारांना अटक करण्यासाठी EOW च्या वेगवेगळ्या टीम लवकरच पंजाब, राजस्थान, गुजरातला धडकतील. त्यानंतर कंपनीच्या राज्यप्रमुखांनाही अटक करू, असं त्यांनी म्हटलंय. ओडिशा पोलिसांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर एसटीएचे सर्व उच्च अधिकारी त्यांचे मोबाईल फोन बंद करून अज्ञातवासात गेले आहेत. "त्यांपैकी एक जण देश सोडून पळून जाण्यात यशस्वी झालाय. आम्ही STA च्या तीन प्रमुख सदस्यांविरुद्ध लुक आऊट सर्क्युलर (LOC) जारी केलं आहे," अशी माहिती त्यांनी दिली. डेव्हिड गीज या हंगेरियन नागरिकासह त्याच्या जवळच्या सहकाऱ्यासाठीदेखील LOC जारी करण्यात आली आहे.

पोंझी घोटाळ्यात 30 कोटींची गुंतवणूक : ओडिशातील भुवनेश्वर, भद्रक, बालेश्वर, मयूरभंज, जाजपूर, केंद्रपारा, केंदुझार जिल्ह्यातील 10 हजारांहून अधिक लोकांनी पोंझी घोटाळ्यात सुमारे 30 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. STA च्या प्रामुख्याने पंजाब, राजस्थान, बिहार, झारखंड, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, आसाम या राज्यांमध्ये दोन लाखांहून अधिक सदस्य आहेत. कंपनीनं आरबीआयच्या परवानगीशिवाय सभासदांकडून शेकडो कोटी रुपये बेकायदेशीरपणे गोळा केले आहेत. नेपाळ, दुबई आणि हंगेरीमधील अनेक लोकांनी STA मध्ये गुंतवणूक केलीय.

हेही वाचा -

  1. Priyanka Chopra And Malti Marie : प्रियांका चोप्राची मुलगी मालती मेरीनं मित्रांसह केला एन्जॉय ; फोटो केले शेअर...
  2. Dhadkan 2 : 'धडकन'चा सीक्वल लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीला; दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी दिली अपडेट...
  3. Aamir khan And Junaid khan : आमिरचा मुलगा जुनैद खान झळकणार साऊथ अभिनेत्री साई पल्लवीसोबत...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.