ETV Bharat / bharat

UP Crime News : पतीने परदेशात न नेल्याचा राग; पत्नीची तीन चिमुकल्यांसह आत्महत्या - प्रतापगड आत्महत्या बातमी

प्रतापगडमध्ये पती परदेशात गेल्यावर एका महिलेने तीन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. पत्नीसह तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jun 22, 2023, 4:03 PM IST

प्रतापगड (उत्तर प्रदेश) : जिल्ह्यात एक वेदनादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तीन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. महिलेसह तीन मुलांचे मृतदेह विहिरीत दिसल्याने ग्रामस्थांनी पोलिसांना याची माहिती दिली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळ गाठून मृतदेह विहिरीतून बाहेर काढले आणि पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

पतीने परदेशात न नेल्याचा राग - संपूर्ण घटना औरंगाबाद कोहदौर कोतवाली परिसरातील गावातील आहे. येथे सोहनलाल यांची पत्नी प्रमिला देवी ( वय ३८) यांनी तीन मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी पैलवान वीरबाबा यांच्या निवासस्थानी बांधलेल्या विहिरीत एका महिलेसह तीन मुलांचे मृतदेह ग्रामस्थांना दिसले. या महिलेला पतीसोबत परदेशात जायचे होते, असे सांगण्यात येत आहे. पतीने परदेशात न नेल्याने तिला राग आला होता. महिलेला पतीसोबत राहायचे होते. एक दिवसापूर्वी पती परदेशात गेला होता, त्यामुळे महिला चांगलीच संतापली होती. पती गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी महिलेने तिच्या तीन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सलोनी (7), शिवांशू (5) आणि दिव्यांश (3) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.

चौघांचा मृत्यू - पती हा परदेशात गेला आहे. परदेशात घेऊन जाण्यासाठी पत्नी पतीच्या मागे लागली होती. मात्र, तरीही पतीने तिला परदेशात नेले नाही. पती परदेशात गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी पत्नीने आपल्या तीन चिमुरड्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुढील तपास सुरू - विहिरीत मृतदेह दिसताच ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहचून पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने चारही मृतदेह बाहेर काढले. सीओ सिटी करिश्मा गुप्ता यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाली आहे. याबाबतचा पुढील तपास केला जात आहे.

हेही वाचा -

  1. Chatrapati Sambhajinagar Crime : सायबर सेलमुळे फसला उपसरपंच अन् दुकानदारचा ऑनलाईन दरोडा; हिरे व्यावसायिकाचे वाचले 110 कोटी
  2. Darshana Pawar Murder : दर्शना पवार खून प्रकरण; प्रेमाला नकार दिला म्हणून राहुलने दर्शनाची केली हत्या
  3. Old Couple Suicide : आजारपणाला कंटाळून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या, गावावर शोककळा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.