ETV Bharat / bharat

पोर्नोग्राफी प्रकरण : शिल्पा शेट्टीच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस..अभिनेत्रीने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाली..

पोर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांची एक टीम शुक्रवारी शिल्पा शेट्टीच्या घरी राज कुंद्रा याला घेऊन पोहोचली. राज कुंद्राविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस शिल्पाच्या घरी पोहोचले आहेत.

crime-branch-team-teaches-at-shilpa-shetty

author img

By

Published : Jul 23, 2021, 5:02 PM IST

Updated : Jul 23, 2021, 5:25 PM IST

मुंबई - पोर्नोग्राफी प्रकरणात शुक्रवारी शिल्पा शेट्टीच्या घरी मुंबई पोलिसांची एक टीम बिजनेसमन राज कुंद्रा यांना घेऊन दाखल झाली आहे. पोलिसांची टीम चौकशी व राज कुंद्राविरोधात पुरावे गोळा करण्यासाठी शिल्पाच्या घरी दाखल झाली आहे. दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अश्लील फिल्म प्रकरणात पती राज कुंद्राला झालेल्या अटकेनंतर सध्याचा काळ आव्हानांचा सामना करण्याचा असल्याचे म्हटले आहे. शिल्पा म्हणाली की, जीवनात अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना केला असून या प्रकरणाचाही ती धैर्याने सामना करेल.

पोर्नोग्राफी तयार करून ते काही अॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या प्रकरणात राज कुंद्रा (45) यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अटक केली होती. मंगळवारी कुंद्रा यांना न्यायालयात दाखल केल्यानंतर त्यांना 23 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आत याची मुदत 27 जुलैपर्यंत वाढवली आहे.

शिल्पा शेट्टीच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस

शिल्पाने गुरुवारी रात्री सोशल मीडिया अॅप इंस्टाग्रामवर अमेरिकी लेखक जेम्स थर्बर यांच्या पुस्तकातील एक उद्धरण शेअर केले आहे. त्यामध्ये लिहिले आहे, की ' क्रोधामध्ये मागे वळून पाहू नये आणि भयभीत होऊन पुढेही जाऊ नये. सावध होऊन जरूर मार्गक्रमण करावे'

crime-branch-team-teaches-at-shilpa-shetty
शिल्पाने शेअर केलेले पुस्तकातील प्रकरण

शिल्पाने इंस्टाग्रामवर लिहिले आहे, की ' मी एक दीर्घ श्वास घेते. मला माहिती आहे, की मी भाग्यशाली आहे, कारण मी जिवंत आहे. यापूर्वीही मी अनेक आव्हानांचा सामना केला आहे आणि भविष्यातही आव्हानांना सामोरे जाईन. मला माझे आयुष्य जगण्यापासून कोणतीही गोष्ट भ्रमित करू शकत नाही.

सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तीन महिलांनी तक्रार केली आहे, की त्यांना राज कुंद्रा यांनी अश्लील चित्रपटात काम करण्यासाठी मजबूर केले. आरोपींनी संघर्ष करत असलेल्या मॉडल, अभिनेत्यांसह अन्य लोकांच्या मजबुरीचा फायदा उठवून त्यांना असे घाणेरडे काम करण्यासाठी बाध्य केले.

Last Updated : Jul 23, 2021, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.