नवी दिल्ली - ओडीशाहून दिल्लीत गांजा आणणाऱ्यांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल 950 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत साडेतीन कोटी रुपये आहे. आरोपींकडून गांजासह एक टेम्पो व दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. चंदन शाह और कृष्ण देव राय, असे आरोपींची नावे आहेत.
ओडीशाहून आणत होते गांजा
आरोपी कृष्ण देव राय हा मुळचा बिहारचा रहिवासी आहे. तो पूर्वी मजूर करत होता. एक वर्षांपूर्वी ओडीशातील मुन्नासह त्याची ओळख झाली. त्यानंतर तो गांजा तस्करी करू लागला. ओडीशा येथून टेम्पोने गांजा आणून तो आरोपी चंदनला देत होता. वाटेत पोलिसांची अडणूक होऊ नये म्हणूत ते टेम्पोवर कोविड - 19 अत्यावश्यक सेवा, असा स्टिकर लावला होता.
हेही वाचा - वाहनांवरील फास्ट टॅगमुळे टोलनाक्यावर ताटकळत थांबण्याची गरज नाही
हेही वाचा - ब्रिटनच्या 'वेबल स्कॉट' रिव्हॉल्व्हरशी स्पर्धा करणार 'प्रहार'