ETV Bharat / bharat

दिल्ली ऑक्सिजन संकट : आपत्कालीन स्थितीसाठी सरकार ठेवणार राखीव ऑक्सिजन साठा

देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. ऑक्सिजन आणि औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये ऑक्सिजन अभावी अनेकांचा प्राण गेले आहेत. या पुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शासनाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

Delhi Oxygen Crisis
Delhi Oxygen Crisis
author img

By

Published : Apr 24, 2021, 2:44 PM IST

नवी दिल्ली - सध्या देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीमध्ये दिल्ली सरकारने काही ऑक्सिजन राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अतिशय आपात्कालीन परिस्थितीमध्ये हा ऑक्सिजन साठा वापरला जाईल, अशी माहिती समोर येत आहे. केंद्राने दिल्लीतील दररोजचा ऑक्सिजनपुरवठा 378 मेट्रिक टनांपासून 480 मेट्रिक टनांपर्यंत वाढवला आहे.

ऑक्सिजन साठ्यावर असणार सनदी अधिकाऱ्यांची नजर -

दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (डीडीएमए) गुरुवारी तीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. हे तीन्ही अधिकारी शहरातील विविध रूग्णालयांमध्ये होणाऱ्या ऑक्सिजन वितरणावर लक्ष ठेवणार आहेत. राखीव ऑक्सिजन साठ्यातून दिल्लीतील रूग्णालयांना ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल. मात्र, त्यासाठी काही अटी आणि नियम आहेत. जर रुग्णालयाकडे तीन तासांपेक्षा कमी वेळ पुरेल इतकाच ऑक्सिजन असेल तर, राखीव साठ्यातून ऑक्सिजनची मागणी करता येईल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

रुग्णालयांनी आरोग्य विभागाला माहिती देणे बंधनकारक -

प्रत्येक रूग्णालयाने त्यांचा एक वरिष्ठ कर्माचाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. हा अधिकारी ऑक्सिजनबाबतची सर्व माहिती अपडेट करत राहिल. यामुळे ऑक्सिजन वितरणात सुलभता येईल, असे रूग्णालय प्रशासनांना सांगण्यात आले आहे. काही रूग्णालये गरजेपेक्षा जास्त ऑक्सिजन वापरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा रूग्णालयांनी ऑक्सिजन वापराबाबत ऑडिट करावे, असे देखील आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

रूग्णालयातील लिक्विड ऑक्सिजनचा साठा, वापर आणि वितरण याबाबत सविस्तर माहिती आरोग्य विभागाला दररोज मिळाली पाहिजे. दररोज किती ऑक्सिजन वापरला गेला पाहिजे याबाबत काही मार्गदर्शक सूचना रूग्णालयांना सांगितल्या जातील. त्यांनी या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. याशिवाय ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांनी देखील त्यांचा दिवसाचा अहवाल शासनाला सादर करणे बंधनकारक केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.