मागील वर्षभरापासून कोविड १९ साथीचा रोग सर्व देशभर आणि जगभरात दहशत निर्माण करीत आहे. या प्राणघातक विषाणूचा धोका कमी होत आहे, असे वाटत असतानाच पुन्हा त्याने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. वारंवार आणि हानिकारक उत्परिवर्तनामुळे हा विषाणू संपूर्ण मानवतेसाठी एक आव्हान निर्माण करीत आहे. तज्ञांच्या मते दक्षिण-आफ्रिका, ब्रिटन, ब्राझील, जपान आणि अमेरिकेत नवीन उत्परिवर्तनांचा विषाणू सापडला आहे.
यूकेमध्ये सापडलेला केंट विषाणू कोविड १९ या विषाणूपेक्षा 70 टक्के अधिक धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे. वेगात पसरत असल्याने त्याबद्दल अधिक चिंता निर्माण झाली आहे. विषाणूचा प्रभाव आणखी वाढणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)च्या संचालकांनी कोरोनाविषाणू उत्परिवर्तनाचा सखोल अभ्यास करण्याची मागणी केली आहे. कठोर कारवाईच्या आवश्यकतेवर यात जोर देण्यात आला आहे.
हेही वाचा - कोरोनाचा खोटा अहवाल घेऊन विमान प्रवासाचा प्रयत्न, ३ व्यक्तींवर एफआयआर दाखल
दुसरीकडे, कोविड १९च्या वाढत्या केसेस धोक्याची घंटा वाजवित आहेत. नव्याने नोंदविलेल्या केसेसपैकी सुमारे 86 टक्के केसेस महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूमधील आहेत. सेंटर फॉर सेल्युलर अणि आण्विक जीवशास्त्र (सीसीएमबी)चे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी सांगितले, की कोविडच्या प्रतिबंधासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणे म्हणजेच सामाजिक अंतर न राखणे, मास्क न वापरणे यामुळे परिस्थिती अधिक खालावत जात आहे.
विषाणूचा प्रसार रोखणे आणि त्यासाठी योग्य ती पावले उचलणे हे सरकारसमोरील आव्हान आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत कोविड कमी होईल, या मताशी जागतिक आरोग्य संघटना सहमत नाही. डब्लूएचओने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे गरजेचे आहे. भारतासारख्या देशात जिथे रुग्णसंख्या वाढती आहे, अशा ठिकाणी या नियमांचे पालन फायद्याचे आहे.
सध्या आलेला नवा विषाणू अधिक हानिकारक आहे. लसीकरणात दिरंगाई झाल्यास परिस्थिती बिघडू शकते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. चाचणीच्या माध्यमातून जो डिटेक्ट होत नाही, त्याचा प्रसार अधिक वेगात होण्याचा धोका वैज्ञानिक व्यक्त करीत आहेत. तेलंगाणा सरकारने तर जिल्हा व प्रादेशिक रुग्णालयांमध्ये तसेच सामुदायिक आरोग्य केंद्रांवर लसीच्या वितरणाला हिरवा कंदिल दिला आहे.
हेही वाचा - 'महाकुंभ' आमचे सर्वोच्च प्राधान्य; उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची माहिती
केंद्र सरकारने 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लस देण्याच्या वेळेची मर्यादा काढून टाकली आहे. आता या वयोगटातील व्यक्ती कोणत्याही वेळी ही लस घेऊ शकतात. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या दराप्रमाणे, वेळेप्रमाणे ही लस कायम राहिल्यास ग्रामीण भागात पोहोचण्यास अनेक वर्षे लागतील. या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर, लसीचे वेगात वितरण करण्याबाबत सरकारची रणनीती व कृती ही काळाची गरज आहे.
उत्पादन आणि सेवनाच्या प्रमाणातील तफावत लक्षात घेता, प्रत्येकाच्या मागणीनुसार लस प्रदान करण्यात सक्षम होण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन हववे. लसीकरण हे एकमेव माध्यम आहे, ज्याद्वारे नागरी समाज सुरक्षिततेच्या छताखाली येईल.
लसीकरण झालेल्या रुग्णांमध्ये अॅन्टीबॉडीज आणि रोग प्रतिकारशक्तीच्या टक्केवारीवर संशोधन सुरू ठेवले तरच राष्ट्र स्वतःला मोठ्या संकट परिस्थितीतून वाचवू शकते.