ETV Bharat / bharat

फायझर आणि अॅस्ट्राझेनका लस घेतल्याने शरीरातील अँटिबॉडिजवर होतो परिणाम

जेव्हा कोरोनाचे नव नवीन व्हेरियंट आव्हान निर्माण करत असताना अशा प्रकार शरीरातील पेशींची संख्या घटत जाणे चिंतेची बाब असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. यूसीएलचे अभ्यासक मॅडी श्रोत्री यांच्या मतानुसार या संशोधनात लसीचा प्रभाव नागरिकांवर एक समान दिसून आला. या संशोधनात सर्व वयोगटातील नागरिकांसह, आजाराने ग्रस्त अशा 600 लोकांची माहि्ती अभ्यासण्यात आला आहे.

शरीरातील अँटिबॉडिजवर होतो परिणाम
शरीरातील अँटिबॉडिजवर होतो परिणाम
author img

By

Published : Jul 29, 2021, 7:36 AM IST

हैदराबाद - फायझर आणि अॅस्ट्राझेनका लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 6 आठवड्यानंतर शरीरामधील अँटीबॉडीज स्तर कमी व्हायला सुरुवात होते. 10 आठवड्यात 50 टक्के पेक्षा जास्त अँटिबॉडीज कमी होऊ शकतात. द लँसेट मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन अहवालामध्ये हा दावा करण्यात आला आहे, की फायझर- अॅस्ट्राझेनकाचे दोन डोस घेतल्यानंतर पेशींची वाढ ज्या गतीने वाढते, 2 ते 3 आठवड्यानंतर तेवढ्याच गतीने त्या घटायला सुरुवात होते. संशोधन अभ्यासमध्ये हे समोर आले आहे, की ही लस कोरोना व्हायरसच्या विरोधात अत्यंत परिणामकारक आहे.

शरीरातील अँटिबॉडिजवर होतो परिणाम
शरीरातील अँटिबॉडिजवर होतो परिणाम

ब्रिटेनमधील यूनिवर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) मधील संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे, की जर शरीरातील पेशींची संख्या घटत राहिली तर कोरोना लसीचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल, जेव्हा कोरोनाचे नव नवीन व्हेरियंट आव्हान निर्माण करत असताना अशा प्रकार शरीरातील पेशींची संख्या घटत जाणे चिंतेची बाब असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. यूसीएलचे अभ्यासक मॅडी श्रोत्री यांच्या मतानुसार या संशोधनात लसीचा प्रभाव नागरिकांवर एक समान दिसून आला. या संशोधनात सर्व वयोगटातील नागरिकांसह, आजाराने ग्रस्त अशा 600 लोकांची माहि्ती अभ्यासण्यात आला आहे. या संशोधनात हे समोर आले आहे, की फायझरचे दोन्ही डोस घेणाऱ्यांच्या तुलनेत अॅस्ट्राझेनका घेणाऱ्यामध्ये जास्त अँटीबॉडी आढळून आल्या आहेत.

शरीरातील अँटिबॉडिजवर होतो परिणाम
शरीरातील अँटिबॉडिजवर होतो परिणाम

भारतात उपलब्ध आहेत तिन्ही लस-

अस्ट्राझेनकाची लस भारतात कोविशील्ड या नावाने तयार करण्यात आली आहे. ही पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार केली जाते. भारतात सध्या फायझर लस उपलब्ध झालेली नाही. भारताच्या राष्ट्रव्यापी लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये फायझर लसीचा समावेश करण्यासाठी त्या कंपनीसोबत चर्चा सुरू आहे. भारतात 18 पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांसाठी आता तीन लसी उपलब्ध आहेत. कोविशील्ड, कोवॅक्सीन आणि रूसची स्पूतनिक व्ही या लसीचा वापर सध्या केला जात आहे.

70 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना बूस्टर डोस देण्याची शिफारस -

या संशोधनातील निष्कर्षानुसार वयस्क नागरिकांना लसीच्या दोन डोसनंतर बूस्टर डोस देण्याची शिफारस करण्यात आली आहे. यूसीएल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ इंफॉर्मेटिक्स ते प्राध्यापक रॉब एल्ड्रिज यांच्या मतानुसार ज्या लोकांना सुरवातीला अॅस्ट्राझेनका लस देण्यात आली आहे, त्यांच्या शरीरात आता अँटीबॉडीचा स्तर खूप कमी होऊ शकतो, अशा लोकांना बूस्टर डोस देण्याची गरज आहे. यासाठी 70 वर्षापुढील नागरिकांना हा डोस देण्याची शिफारस या संशोधन अभ्यासातून करण्यात आली आहे.

फायझर आणि अॅस्ट्राझेनका लस
फायझर आणि अॅस्ट्राझेनका लस

सातत्याने कोविडवर सुरू आहे लँसेंटचे संशोधन

लँसेट या संशोधन संस्थेने कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा शोध लागण्यापूर्वीच एक अहवाल प्रकाशित केला होता. त्यात असा दावा करण्यात आला होता की, फायझर आणि आणि अँस्ट्राझेनका लसीचा एक डोस 65 वयापेक्षा जास्त असलेल्या नागरिकांना जवळपास 60 टक्के सुरक्षा देऊ शकते. या शिवाय भारत आणि इंग्लंड मधील संशोधकांनी दोन वेगवेगळ्या संशोधनातून हे जाणून घेतले होते की अँस्ट्राझेनका-ऑक्सफोर्ड या कोविड-19 लसीचे डोस घेणाऱ्या 11 जणांमध्ये दुर्लभ प्रकारचे न्यूरोलॉजिकल आजार उद्धभवले, ज्याला गुलेन-बॅरे सिंड्रोम नाव देण्यात आले आहे. सध्या नवीन संशोधनाचे निष्कर्षही समोर आले आहेत,त्या पार्श्वभूमीवर सरकारला आता हे निश्चित करावे लागणार आहे, की बूस्टर डोसची गरज आहे किंवा नाही.

बूस्टर डोस काय आहे?

प्रत्येक वयोगटासाठी कोरोनाची लस तयार आहे. ज्यावेळी लस घेतली जाते, त्यावेळी शरीरात अँटीबॉडी तयार होतात. ज्यामुळे शरीरातील कोरोनाच्या विषाणूला निष्क्रीय करण्याचे काम करतात , बूस्टर हा असा डोस आहे जो कोणत्याही आजाराच्या विरोधात व्यक्तीच्या इम्यूनिटीमध्ये वाढ करण्यासाठी दिला जातो. अँटीबॉडी शरीरात 'इम्यूनोलॉजिकल मेमरी' च्या आधारावर काम करत असतात. संशोधनात हे सांगण्यात आले आहे की जरी अँटीबॉडी कमी असल्यातरी या डोसमुळे प्रतिरोधक क्षमता इम्यूनोलॉजिकल मेमोरी मध्ये टिकून राहतात. ज्यामुळे या विषाणूपासून आपणास बऱ्याच काळापर्यंत सुरक्षा मिळते. हा बूस्टर डोस शरीरात तत्काळ इम्यून सिस्टमला सक्रिय करतो.

डब्ल्यूएचओच्या मतानुसार ऑक्सफोर्ड अॅस्ट्राझेनका चे दोन डोस 65-90 टक्के परिणामकारक आहेत. मॉडर्ना आणि फायजर बायोनटेकचे दोन डोस 95 टक्के परिणामक कारक आहेत. तर गामालेया या लसीचा परिणाम 92 टक्के इतका आहे. डब्ल्यूएचओने ही माहिती सुरवातीच्या चाचणी परिक्षणाच्या निष्कर्षाच्या आधारावर दिली आहे

फायझरची मागणी असलेली लस-

संशोधनात फायझरच्या वापरामुळे 6 आठवड्यानंतर शरीरातील अँटीबॉडी कमी होत असल्याचे समोर आले असले तरीही, या लसीची मागणी वाढली आहे. एक वृत्तपत्राच्या अहवालानुसार फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलबर्ट बौर्ला यांच्या मते फ्लूच्या लसी प्रमाणे कोरोनाच्या या प्रतिबंधात्मक लसीची मागणी सातत्याने वाढत जाणारी आहे. 2021 च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) कंपनीचे सर्वाधिक विकले जाणारे उत्पादन कोरोना लस होती. पहिल्या तिमाहित कोरोना लस विक्रीच्या माध्यमातून कंपनीने 350 कोटी डॉलर (25.9 हजार कोटी रुपये) चे उत्पन्न झाले. तर एकूण उत्पन्न 1460 कोटी डॉलर (1.08 लाख कोटी रुपये) होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.