नवी दिल्ली - गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाची 25 हजार 320 नवीन रुग्ण आढळली आहेत. तर संसर्गामुळे 161 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या 1 कोटी 13 लाख 59 हजार 48 वर गेली आहे. मृत्यूनंतर एकूण मृत्यूची संख्या 1 लाख 58 हजार 607 पर्यंत वाढली आहे. तर 130 कोटींची लोकसंख्या असलेल्या भारतात
त्याचबरोबर, देशात सध्या सक्रीय रुग्णांची संख्या 2 लाख 10 हजार 544 आहे. तर डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 9 लाख 89 हजार 897 आहे. दुसरीकडे, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) नुसार कोरोना विषाणूची आजपर्यंत भारतात एकूण 2 कोटी 97 लाख 38 हजार 409 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर शनिवारी दिवसभरात 8 लाख 64 हजार 368 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली.
कोरोनावर मात करण्याचे सरकारचे ध्येय -
एका दिवसात सर्वाधिक लोकांना लस भारतात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. एका व्यक्तीला दोन लसीचे डोस दिले जात असून या दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर असते. लसीकरण पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिल्यानंतर देशभरात आता सहव्याधी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने कोरोनाची लस दिली जात आहे. देशात अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करून कोरोनावर मात करण्याचे सरकारचे ध्येय आहे.
देशातील नामवंत व्यक्तिंनी घेतली लस -
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, उद्योजक रतन टाटा, सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांच्यासह देशातील अनेक नामवंत व्यक्तिंनी कोरोनाची लस घेतली आहे
हेही वाचा - आंध्र प्रदेशात भीषण अपघात; 6 जण ठार तर 7 जण