मुंबई भारतात कोरोना संसर्गाचा वेग मंदावतोय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सोमवारी दिवसभरात 5 हजार 439 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत घट पाहायला मिळाली आहे. तर सलग तिसर्या दिवशी 24 तासांत 10 हजारांहून कमी कोरोनाबाधित रुग्ण Corona patient आढळले आहेत. देशात शुक्रवारी 9 हजार 520 नवीन कोरोना रुग्णांची New Coronavirus Cases नोंद झाली होती. त्याच्या तुलनेत रविवारी 84 रुग्णांची घट झाली आहे. Coronavirus Cases in India दिलासादायक बाब म्हणजे नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची new cases recorded संख्या जास्त आहे.
कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त देशात गेल्या 24 तासांत 22 हजार 031 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. सध्या देशात 65 हजार 732 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. India Corona Updates यापैकी सर्वाधिक रुग्ण सौम्य लक्षणे असणारे आहेत. देशात रविवारी दिवसभरात 26 लाख 53 हजार 964 कोविड लसी देण्यात आल्या असल्याची माहिती देखील केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. तर दैनंदिन कोरोना रुग्ण सकारात्मकता दर 1.70 टक्के आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 65 हजार 732 इतकी देशातील कोरोना रुग्णांप्रमाणे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांमध्येही India Corona Updates घट झाली आहे. सध्या देशात 65 हजार 732 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. यामधील बहुतांश रुग्ण हे सौम्य लक्षणं असणारे आहेत. देशात गेल्या 24 तासांत 22,031 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहे. देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 38 लाख 25 हजार 24 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
चाचण्या कमी झाल्याने कोरोनाच्या ३५१ रुग्णांची नोंद मुंबईत रोज ८ ते १३ हजार दरम्यान चाचण्या केल्या जातात. यामुळे ८०० ते १२०० दरम्यान रोज रुग्णसंख्या नोंद होत होती. आज सोमवारी चाचण्या कमी झाल्याने ३५१ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत काल ४ मृत्यूची नोंद झाली होती, आज ३ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ४७२८ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
३५१ नवे रुग्ण मुंबईत आज २९ ऑगस्टला ६,७०० चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३५१ रुग्णांची नोंद झाली. आज ३ मृत्यूची नोंद झाली आहे. ५८९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ४३ हजार ६६९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख १९ हजार २५९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४७२८ सक्रिय रुग्ण Active Corona Patients आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १०९८ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०६३ टक्के इतका आहे.