ETV Bharat / bharat

कोरोना व्हायरसपासून लहान मुलांची काळजी कशी घ्यावी? - कोरोना अपडेट

सध्या कोरोनाची जागतिक साथ सुरू असताना सर्व पालकांच्या मनात आपल्या मुलांना कोरोना झाला तर काय करायचे, तो मुलांमध्ये टाळायचा कसा हे प्रश्न मनात येणे साहजिक आहे. यावर तज्ञांनी मुलाचे कोरोनापासून संरक्षण कसे करायचे, याबद्दल काही सूचना केल्या आहेत.

Corona phase-2: Corona strikes on children in Gujarat, increase in number of coronavirus positive cases of children
Corona
author img

By

Published : Apr 7, 2021, 11:09 PM IST

Updated : Apr 8, 2021, 2:17 AM IST

अहमदाबाद - देशभरात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. महाराष्ट्रात कोरोना प्रकरणांची संख्या वाढत आहे. संपूर्ण राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. तर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची लक्षणे अत्यंत प्राणघातक असल्याचे सिद्ध झाले आहे. यातच कोरोनाने मुलांच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, मुलांना संसर्ग होण्याची शक्यता असते, म्हणूनच डॉक्टर बहुतेकदा सल्ला देतात की मुलांना शक्यतो घरातच ठेवले पाहिजे.

माहिती देताना बालरोग तज्ज्ञ डॉ. निश्चल भट्ट

सध्या कोरोनाची जागतिक साथ सुरू असताना सर्व पालकांच्या मनात आपल्या मुलांना कोरोना झाला तर काय करायचे, तो मुलांमध्ये टाळायचा कसा हे प्रश्न मनात येणे साहजिक आहे. यावर तज्ञांनी मुलाचे कोरोनापासून संरक्षण कसे करायचे, याबद्दल काही सूचना केल्या आहेत.

कोरोना झाल्यानंतर मुलांना ताप येतो. मुलांना 3 ते 4 दिवसांपासून ताप असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे. लहान मुलांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणं दिसत नाहीत. सुरत येथे एक 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू कोरोनामुळे झाला. त्याला कोरोनाची कोणतीही लक्षण नव्हती. यामुळे पालकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

गेल्या वर्षीही मुलांना संसर्ग झाला होता. परंतु त्यांची संख्या कमी होती. परंतु यावेळी अधिक मुलांना संसर्ग होत आहे. कारण, त्यांच्या कुटुंबातील सदस्य संसर्गीत आहेत. मुलांना कुटुंबातील वृद्ध सदस्यांपासून दूर ठेवले पाहिजे. सुरतमध्ये 150-200 मुलांना ताप, सर्दी आणि खोकलाची लक्षणे आढळून आली होती. त्यांची रक्त तपासणी आणि अँटीजेन चाचणी घेण्यात आली. ताप, सर्दी आणि खोकला हे लहान मुलांमध्ये सामान्य आहेत. परंतु जर ताप तीन चार दिवसांपेक्षा जास्त काळ चालू राहिला, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मात्र, जास्त घाबरण्याचे कारण नाही. लहान मुलांमध्ये एसीई-२ प्रापकाची (रिसेप्टर) वाढ जास्त न झाल्याने, कोरोना विषाणूची बाधा तुलनेने कमी दिसते, असे सूरतचे बाल विशेषज्ञ डॉ. पूर्वेश ढाकेचा यांनी सांगितले.

अहमदाबादचे प्रख्यात बालरोग तज्ञ डॉ. निश्चल भट्ट यांनी सोशल अंतर राखणे, मास्क घालणे, साबण आणि सॅनिटायझरने हात धुणे आणि वेळेत लसीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.मुलांना अलग ठेवणे आवश्यक आहे. घराबाहेर पडू नये. बाहेर पडल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते, असे मुलांमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या वाढत्या घटनांचा विचार करता सूरत नगरपालिका आयुक्त बंचनिधि यांनी सांगितले.

हेही वाचा - मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद, परीक्षेला जगण्या-मरण्याचा प्रश्न समजू नका

Last Updated : Apr 8, 2021, 2:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.