नवी दिल्ली - भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सुमारे 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जारी केलेल्या अहवालानुसार, 24 तासांत 2,927 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ( PM Interacting CM All The States ) या दरम्यान, कोविड-19 मुळे देशात 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 16,279 आहे. गेल्या 24 तासांत 2,252 रुग्णांना कोरोना संसर्गातून मुक्तता मिळाली आहे. तर सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.75 टक्के इतका आहे.
मृतांची संख्या 26,169 इतकी - देशाची राजधानी दिल्लीतही प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. मंगळवारी दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 1,204 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सोमवारी, राष्ट्रीय राजधानीत 1,011 प्रकरणे आणि एक मृत्यूची नोंद झाली, तर सकारात्मकता दर 6.42 टक्क्यांवर पोहोच आहे. आरोग्य विभागाने एका बुलेटिनमध्ये म्हटले आहे की राष्ट्रीय राजधानीत विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या 18,77,091 आहे आणि मृतांची संख्या 26,169 इतकी आहे.
12 वर्षांवरील वयोगटासाठी 'ZyCoV-D' मंजूर - यामध्ये ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने मंगळवारी 6-12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या मर्यादित आपत्कालीन वापरास परवानगी दिली. (DCGI)ने लस उत्पादकाला पहिल्या दोन महिन्यांसाठी दर 15 दिवसांनी योग्य विश्लेषणासह प्रतिकूल घटनांच्या डेटासह सुरक्षितता डेटा सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी ट्विट केले की, कोविडविरुद्धचा लढा आता अधिक मजबूत झाला आहे. 6 ते 12 वयोगटासाठी 'कोव्हॅक्सिन'चे दोन डोस, 5 ते 12 वयोगटासाठी 'कॉर्बेव्हॅक्स' आणि 12 वर्षांवरील वयोगटासाठी 'ZyCoV-D' मंजूर करण्यात आले आहेत.
चिंता व्यक्त केली - देशात कोरोनाचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला होता. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकार पुन्हा एकदा सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज आज दुपारी 12 वाजता ही ऑनलाईन बैठक होणार असून, पंतप्रधान देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतील. देशात हळूहळू रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - Task Force Committee : कोरोना वाढतोय.. पंतप्रधानांची आज बैठक, टास्क फोर्सचा मास्क सक्तीचा प्रस्ताव