ETV Bharat / bharat

Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्या या फोटोवर का होतो आहे विवाद, जाणून घ्या कोण आहे ही महिला.. - controversy over photo of Rahul Gandhi

प्रीती गांधी (PRITI GANDHI) नावाच्या भाजप कार्यकर्त्याने राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) फोटोवर एक विवादास्पद कमेंट केल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसने हा सर्व प्रकार अत्यंत खालच्या दर्जाचा असल्याचे म्हटले आहे. अखेर प्रीती यांनी काय लिहिलं, ज्यावर काँग्रेसवाले नाराज आहेत, जाणून घेऊया संपूर्ण वाद. (photo of Rahul Gandhi).

photo of Rahul Gandhi during bharat jodo yatra
राहुल गांधी यांचा फोटो
author img

By

Published : Oct 30, 2022, 6:01 PM IST

हैदराबाद: राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) सध्या तेलंगणामध्ये आहे. आपल्या प्रवासादरम्यान राहुल विविध समुदाय आणि प्रदेशातील लोकांना भेटत आहेत. शनिवारी एक महिला राहुल गांधींना भेटण्यासाठी आली होती. त्या महिलेसोबत राहुल यांचा एक फोटो क्लिक झाला होता. यामध्ये ते तिचा हात धरलेला दिसत आहेत. यावर भाष्य करताना भाजप कार्यकर्त्या प्रीती गांधी (PRITI GANDHI) यांनी लिहिले की, राहुल गांधी त्यांचे आजोबा नेहरूंचे अनुसरण करत आहेत. त्या नेहरू आणि एडविना माउंटबॅटन यांचा उल्लेख करत होत्या. त्यांच्या या कमेंट वर काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.

ही महिला एक अभिनेत्री आहे. ती तेलुगु चित्रपटांमध्ये काम करते. ती राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील होण्यासाठी आली होती. सोशल मीडियावर कमेंट करणाऱ्यांनी राहुल गांधींबद्दल बरेच काही लिहिले आहे. काही लोकांनी नेहरूंचा जुना फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ते एडविना माउंटबॅटनसोबत दिसत आहेत.

काय म्हणाले नेते? : काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रीती यांच्यावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, यातून तुमची वाईट विचारसरणी दिसून येते. तुम्हाला उपचाराची गरज आहे.

  • Yes he is following in the footsteps of his great grandfather - and is uniting this great country of ours.

    That aside, your childhood traumas are deep and a proof of your sick mind. You need treatment. https://t.co/AP4Z5HgfJA

    — Supriya Shrinate (@SupriyaShrinate) October 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, माणसाच्या खांद्याला खांदा लावून चालण्याने देशाची प्रगती होते. आंबेडकर, नेहरू आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांची ही विचारसरणी होती.

एका युजरने लिहिले आहे की, ही कमेंट म्हणजे महिलेच्या अस्मितेवर हल्ला आहे आणि खेदाची गोष्ट म्हणजे हे भाजपने केले आहे. प्रीती गांधी यांची लाज वाटते.

एका व्यक्तीने लिहिले की, हे मूर्खपणाचे ट्विट आहे. पण काँग्रेसनेही मोदींबाबत असेच ट्विट केले असून सर्वसामान्यांनीही ते नापसंत केले आहे.

फोटोत असणारी महिला काय म्हणाली? : ज्या महिलेचा राहुल गांधीसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे ती एक अभिनेत्री आहे. पूनम कौर असे तिचे नाव आहे. पूनमने स्वतः तिच्या ट्विटमध्ये लिहिले की, हे अत्यंत अपमानास्पद आहे. पंतप्रधान महिला शक्तीबद्दल बोललेले आठवते का? मी घसरलो होते आणि पडणार होते तेव्हा राहुल सरांनी माझा हात पकडला.

पूनम कौर लिहितात की, राहुल गांधींची महिलांबद्दलची काळजी, आदर आणि दृष्टीकोन माझ्या हृदयाला भिडला. विणकरांचे प्रश्न ऐकल्याबद्दल विणकर संघासह मी तुमचे आभार मानते. पूनम ही हैदराबादची आहे. पूनमचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण हैदराबादमध्ये झाले आहे. पूनमने दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून शिक्षण घेतले आहे. पूनम कौरने अनेक चित्रपट केले आहेत.

  • This is absolutely demeaning of you , remember prime minister spoke about #narishakti - I almost slipped and toppled that’s how sir held my hand . https://t.co/keIyMEeqr6

    — पूनम कौर ❤️ poonam kaur (@poonamkaurlal) October 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.