ETV Bharat / bharat

Leadership Of Sonia Gandhi : काॅग्रेसच्या मॅरेथॉन बैठकीनंतर सोनिया गांधींच्या नेतृत्वावरच विश्वास - Congress Executive

काँग्रेस कार्यकारिणीची मॅरेथाॅन बैठक (Meeting of Congress Executive) रविवारी संपली पक्षातील असंतुष्ट नेत्यांच्या गट जी 23 ने पक्षाच्या नेतृत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले. त्याच बरोबर संघटनेच्या फेरबदलासाठी दबाव (Pressure for organizational reshuffle) आणला. आणि अंतर्गत मतदानाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला जाऊ शकतो असे संकेत दिल्याने काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर पुन्हा एकदा सोनियांच्या नेतृत्वावर विश्वास (CWC 'unanimously reaffirms faith' in Sonia Gandhi's leadership ) व्यक्त केला आहे.

Meeting of Congress Executive
काँग्रेस कार्यकारिणीची बैठक काँग्रेस कार्यकारिणीची बैठक
author img

By

Published : Mar 13, 2022, 10:23 PM IST

नवी दिल्ली: काँग्रेस कार्यकारिणीची (सीडब्ल्यूसी) (Congress Executive) बैठक रविवारी संपली, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे ( All India Congress Committee) सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले, "सीडब्ल्यूसीने एकमताने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे " त्यांनी असेही सांगितले की अध्यक्ष लवकरच पक्षाला पुन्हा बळकट करण्यासाठी उपाययोजना सादर करण्याच्या प्रक्रियेत आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर एक रणनीती तयार करण्याचा कार्यक्रम आखला जाईल तत्पुर्वी काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांचा गट पुन्हा एकत्र येऊन चर्चा करेल.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रणनीतीचा कार्यक्रम राजस्थानात आयोजित करण्याची सूचना केली आहे. "काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आमचे नेतृत्व करतील आणि भविष्यातील पावले उचलतील. आम्हा सर्वांचा त्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे," असे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकांचे निकाल आणि भविष्यातीव वाटचाल हाच बैठकीचा मुख्य विषय होता. सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्ष आहेत. 5 राज्यांच्या निवडणुकां आणि आगामी निवडणुकांची तयारी यावर आम्ही चर्चा केली.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पक्षप्रमुख राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा, केसी वेणुगोपाल, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पी चिदंबरम आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. बैठकीपूर्वी असंतुष्ट नेत्यांच्या प्रतिनिधींनी, पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले तसेच संघटनेच्या फेरबदलासाठी दबाव आणला, त्यांनी सूचित केले की अंतर्गत निवडणुकांचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला जाऊ शकतो. या बैठकीत गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा हे असंतुष्ठ नेतेही सहभागी झाले होते.

काँग्रेसने 'आप' कडून पंजाब गमावले, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर हे भाजपकडून हिसकावून घेऊ शकले नाही आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये पक्षाची संख्या सर्वात खालच्या पातळीवर गेली. सोनिया गांधी सक्रियपणे प्रचार करत नव्हत्या राहुल गांधी, प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह, निवडणुकीत काँग्रेसचे स्टार प्रचारक सक्रीय होते. राहुल आणि प्रियंका यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये प्रमुख भूमिका बजावली होती.

बैठकीपूर्वी, अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात बोलताना सांगितले होते की, ते काँग्रेस अध्यक्षपदासाठी योग्य आहेत. "राहुल गांधींनी पक्षाचे अध्यक्ष व्हावे. गेल्या 3 दशकांपासून गांधी घराण्यातील कोणीही पंतप्रधान किंवा मंत्री बनले नाही. काँग्रेसच्या ऐक्यासाठी गांधी कुटुंब महत्त्वाचे आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे." नुकत्याच पार पडलेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाचे खापर त्यांनी अंतर्गत संघर्षाला दिले. "चन्नी मुख्यमंत्री झाल्यानंतर वातावरणही अनुकूल होते, पण अंतर्गत संघर्षामुळे पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला, ही आमची चूक होती," असे ते म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधींना पक्षाध्यक्ष बनवण्याची मागणी करत अनेक काँग्रेस कार्यकर्ते नवी दिल्लीतील एआयसीसीच्या मुख्यालयाबाहेर जमा झाले होते. प्रियंका गांधी वड्रा यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार असूनही, काँग्रेसला उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा जागांपैकी फक्त दोनच जागा जिंकता आल्या आणि मतांची टक्केवारी 2.33 टक्क्यांपर्यंत घसरली आणि त्यांच्या बहुतांश उमेदवारांनी डिपाॅझिटही गमावले.

तत्पूर्वी, 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. हंगामी अध्यक्ष म्हणून पुन्हा पक्षाची सूत्रे हाती घेतलेल्या सोनिया गांधी यांनी ऑगस्ट 2020 मध्ये जोरदार टीकेनंतर राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. नेत्यांच्या असंतुष्ठ असलेल्या वर्गाने, ज्याला जी-23 म्हणून ओळखले जाते त्यांनीही पुढे त्यांनाच अध्यक्षपदी ठेवण्याचा आग्रह केला होता. आदल्या दिवशी, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी पक्षाच्या रणनीतीवर चर्चा केली आणि सार्वजनिक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यासाठी इतर समविचारी पक्षांसोबत समन्वयाने काम करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : Goa BJP MLAs Displeasure : गोव्यात भाजपमध्ये दुफळी.. आमदारांचे नाराजीनाट्य.. राजकीय हालचाली वाढल्या..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.