ETV Bharat / bharat

Race for Karnataka CM 2023 : कर्नाटकात मुख्यमंत्री पदाचा पेच कायम; डीके शिवकुमार म्हणाले, माझी ताकद 135 आमदार!

author img

By

Published : May 16, 2023, 8:34 AM IST

Updated : May 16, 2023, 8:47 AM IST

कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावरुन सध्या चांगलेच रणकंदन सुरू आहे. काँग्रेस नेते सिद्धरामय्या हे दिल्लीत तळ ठोकून बसले आङेत. तर डीके शिवकुमार यांनीही मुख्यमंत्री पदावर दावा केल्याची चर्चा आहे. कर्नाटक विधानसभेत निवडून आलेले 135 आमदार आपली ताकद असल्याचे डीके शिवकुमार यांनी स्पष्ट केले.

Race for Karnataka CM 2023
डीके शिवकुमार

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 मध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र आता कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरुन मोठे रणकंदन सुरू झाले आहे. कर्नाटक मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. सिद्धरामय्या सोमवारपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत, तर कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी सोमवारी दिल्ली गाठली आहे. यावेळी त्यांनी आपली ताकद 135 आमदार असल्याचे स्पष्ट केल्याने मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत चुरस निर्माण झाल्याचाच इशारा दिला आहे.

कर्नाटकामध्ये भाजपचे डबल इंजिनचे सरकार होते. मात्र तरीही या डबल इंजिनच्या भ्रष्टाचारी सरकारविरोधात कर्नाटक काँग्रेसने माझ्या अध्यक्षतेखाली 135 जागा जिंकल्या आहेत. जनतेने आम्हाला पाठिंबा देऊन 135 जागांवर विजयी केले. त्यामुळे माझी ताकद 135 आमदार आहे. - डीके शिवकुमार

हायकमांडने बोलावले दिल्लीत : काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने त्यांना सिद्धरामय्या यांच्यासह दिल्लीला बोलावल्याची माहिती डीके शिवकुमार यांनी दिली. आपण सोमवारी दिल्लीत येणार होतो, पण पोटाच्या संसर्गामुळे हायकमांडची प्रस्तावित भेट रद्द केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. मात्र आज माझा वाढदिवस असल्याने मोठ्या संख्येने नागरिक मला शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. मला माझ्या कुटुंबासह माझ्या कुलदैवताच्या दर्शनासाठी जावे लागते. तिथे गेल्यानंतर मी दिल्लीला रवाना होईल. मी कधी दिल्लीला जाईन माहीत नाही. जे फ्लाइट उपलब्ध असेल त्याने मी दिल्लीत जाईल, अशी माहिती डीके शिवकुमार यांनी एक दिवस अगोदर दिली होती.

काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व घेईल निर्णय : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सोमवारी दिल्लीत पोहोचले. निरीक्षकांनी आमदारांकडून घेतलेल्या मताचा अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावावर काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. बंगळुरू येथे रविवारी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (CLP) बैठकीत निरीक्षकांनी त्यांचे मत मांडले आहे. आम्ही एक ओळीचा ठराव मंजूर केला आहे, यामध्ये आम्ही हा मुद्दा पक्षप्रमुखांवर सोडणार असल्याचे डीके शिवकुमार यांनी स्पष्ट केले आहे. मी इतरांसोबत संख्याबळावर बोलू शकत नाही, पण 135 आमदार ही माझी ताकद असल्याचे डीके शिवकुमार यांनी स्पष्ट केले.

माझ्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने मिळवला विजय : कर्नाटकामध्ये भाजपचे डबल इंजिनचे सरकार होते. मात्र तरीही या डबल इंजिनच्या भ्रष्टाचारी सरकारविरोधात कर्नाटक काँग्रेसने माझ्या अध्यक्षतेखाली 135 जागा जिंकल्या आहेत. जनतेने आम्हाला पाठिंबा देऊन 135 जागांवर विजयी केले. कर्नाटकमधील काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचे आणि एकजुटीचे देशभरातून कौतुक होत आहे. स्थानिक पातळीवरून अधिक पाठिंबा मिळाला असता, तर आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. त्यामुळे जागांची संख्या वाढली असती, मात्र तरीही आम्ही आनंदी असल्याचेही डीके शिवकुमार यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा -

  1. Race for Karnataka CM 2023 : पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार, दिल्लीला जाणार नाही: डी के शिवकुमार यांची स्पष्टोक्ती
  2. Karnataka Congress CM : कर्नाटकचा मुख्यमंत्री निवडण्याचे हायकमांडसमोर आव्हान; दोघांचीही प्रबळ दावेदारी
  3. Mamata Banerjee On Congress : काँग्रेसला कर्नाटकात मदत करू, त्यांनी बंगालमध्ये आमच्याबरोबर लढू नये - ममता बॅनर्जी

Last Updated : May 16, 2023, 8:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.