ETV Bharat / bharat

Congress On Modi : पंतप्रधानाच्या 51 मिनिटांच्या भाषणात 44 वेळा काँग्रेसचा उल्लेख, काँग्रेसनं केली मोदींवर टीका - मध्य प्रदेशात 18 वर्षे भाजपाची सत्ता

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशातील 51 मिनिटांच्या भाषणात 44 वेळा काँग्रेसचा उल्लेख केला. मध्य प्रदेशात 18 वर्षे भाजपाची सत्ता आहे, तिथं तुम्ही 44 वेळा काँग्रेसचं नागरिकांची दिशाभूल करुन नाव घेत असल्याच आरोप काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवर केलाय.

Congress On Modi
Congress On Modi
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 8:31 PM IST

हैद्राबाद : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार राजकीय हल्ला चढवला होता. अगदी काँग्रेसलाही शहरी नक्षलवाद्यांची टोळी म्हटलं जायचं असं ते म्हणाले होते. त्यांवर काँग्रेसनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Yesterday, in Bhopal, where BJP has been ruling for over 18 years,

    PM Modi sang a song of 51 minutes long, It was ‘Congress’, ‘Congress’, all along. He repeated it 44 times; that’s almost 44 minutes, for heaven’s sake.

    Why is he so fascinated by Congress? Is it Turuu Love?😱 pic.twitter.com/xJLTb0HrIZ

    — Srinivas BV (@srinivasiyc) September 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राजकीय हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी हे मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केलाय. त्यांचाच पक्ष चार वेळा सत्तेत असलेल्या मध्य प्रदेशसारख्या राज्यातही विरोधकांवर हल्ला करत आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस पक्षाचा इतक्या वेळा उल्लेख केला, जणू ते काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत, असा टोमणा पवन खेरा यांनी लगावला.

सरकारचं काम 'शून्य' : पत्रकार परिषदेला बोलताना पवन खेरा म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेशातील 51 मिनिटांच्या भाषणात 44 वेळा काँग्रेसचा उल्लेख केला. ज्या राज्यात 18 वर्षे भाजपची सत्ता आहे, तिथे तुम्ही 44 वेळा काँग्रेसचं नाव घेत आहात. यावरून मध्य प्रदेशातील सरकारचं काम 'शून्य' असून केवळ खोटी भाषणं केली जात असल्याचं दिसून येतं. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, 2018 मध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन होऊन केवळ 15 महिने टिकलं. या काळात 6 लाख तरुणांना युवा स्वाभिमान योजनेचा लाभ देण्यात आला. 20 लाख शेतकऱ्यांना सरकारनं मदत केली. पुरस्कार देऊनही राजस्थानमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या गेहलोत सरकारवर पंतप्रधानांनी टीका केली.

काँग्रेस सरकारवर टीका : पंतप्रधानांनी राजस्थानमधील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली. महामारीच्या काळात प्रभावी प्रशासनासाठी त्यांनी राज्याला कसं बक्षीस दिलं, हे ते विसरले असावेत. सत्तेत असताना गेहलोत यांनी 2 हजार 500 महाविद्यालयं उघडली होती. विकास केला, स्वास्थ आणलं, चिरंजीवी योजना, 25 लाखांचा विमा मिळाला. एकेकाळी 9.2% असलेली वित्तीय तूट आता 3% इतकी कमी झाली आहे. तरीही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप कसा?" असा सवाल त्यांनी केलाय.

महिला आरक्षणाला आणखी 10 वर्षे लागतील : महिला आरक्षण विधेयकाला कायदा बनवण्यावरून काँग्रेसनं भाजपलाही धारेवर धरलं. पवन खेरा म्हणाले, "भाजपा काँग्रेसवर महिला आरक्षणविरोधी असल्याचा आरोप करतो, तर 1989 मध्ये आम्ही (काँग्रेस) लोकसभेत विधेयक मंजूर करून राज्यसभेत आणलं. तेव्हा सातपैकी चार जणांनी विधेयकाला विरोध केला होता. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, राम जेठमलानी, जसवंत सिंग हे भाजपाचेच होते. महिला विधेयकाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले, त्यांना 9 वर्षांची सत्ता, विधेयक मंजूर करायला विरोधकांचा पूर्ण पाठिंबा मिळाला. ज्याची अंमलबजावणी होण्यासाठी आणखी 10 वर्षे लागतील.

भाजपाकडून उमेदवारी जाहीर : राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणामध्ये या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत. भाजपा, काँग्रेस या दोन्ही पक्षांनी राजकीय क्षेत्रात जोरदार प्रचार सुरू केला आहे. दोन्ही पक्षांचे नेते राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. भाजपानं मध्यप्रदेशातील 39 उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. 3 केंद्रीय मंत्री, 4 खासदारांना तिकीट देण्यात आलं आहे.

हेही वाचा -

Rozgar Melava 2023 : पंतप्रधानांनी 51 हजार उमेदवारांना दिलं नियुक्ती पत्र

Amit Khare gets extension : अमित खरे यांना पंतप्रधान मोदींचे सल्लागार म्हणून मुदतवाढ

Canada Travel Advisory India : भारत-कॅनडात तणाव; भारतातील कॅनडा नागरिकांना सतर्क राहण्याचा 'ट्रूडों'चा सल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.