नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी कोरोनावर श्वेतपत्रिका जाहीर केली आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचे व्यवस्थापन हे विनाशकारी होते, हे स्पष्ट आहे. त्यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. विषाणू सतत रुप बदल असल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतरही आणखी लाट येणार असल्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले, की कोरोनाच्या श्वेतपत्रिकेमागे सरकारवर बोट दाखविण्याचा उद्देश नाही. तर सरकारला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग थोपविण्याकरिता देशाला मदत करण्याचा उद्देश आहे. संपूर्ण देशाला माहित आहे, कोरोनाची तिसरी लाट धडकणार आहे. त्यापूर्वी तयारी केली तर असंख्य लोकांचे प्राण वाचू शकणार आहेत.
हेही वाचा-दिल्लीत मंथन : २०२४च्या निवडणुकीबाबत शरद पवार, यशवंत सिन्हांसह देशातील 15 विरोधी पक्षांची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदीवर राहुल गांधींची टीका
पुढे गांधी म्हणाले, की पंतप्रधानांचे अश्रू हे लोकांचे अश्रू पुसू शकत नाहीत. हे त्यांना माहित आहे. त्यांचे अश्रू लोकांना वाचवू शकत नाहीत. ऑक्सिजन प्राण वाचवू शकला असता. मात्र, पंतप्रधानांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यांचे लक्ष दुसरे कुठेतरी निवडणूक होत असताना होते, अशी खोचक टीकाही राहुल गांधी यांनी केली.
हेही वाचा-'मोदी सरकारने कर वसुलीत पीएचडी'; राहुल गांधींचा इंधनाच्या वाढीव किंमतींवरून केंद्रावर हल्लाबोल
कोरोना महामारीची स्थिती हाताळण्यावरून काँग्रेस आणि विरोधी पक्ष हे सात्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. केंद्राकडून केवळ प्रसिद्धीचे तंत्र वापरले जात असल्याचा काँग्रेसने आरोप केला आहे.
नुकतेच इंधन दरावरून केंद्रावर टीका
पेट्रोल आणि डिझेलवरील करातून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर नुकतेच टीका केली आहे. राहुल यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील करापासून मिळणार्या उत्पन्नाशी संबंधित एक वृत्त शेअर केले असून मोदी सरकारने कर संकलनात पीएचडी केली आहे, असे टि्वट केले.