ETV Bharat / bharat

CWC : कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांच्या नावांची घोषणा, महाराष्ट्रातून कोणाची वर्णी? - काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांची नावे

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्या नव्या टीमची घोषणा केलीय. रविवारी त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांची (CWC) नावे जाहीर केली. समितीच्या सदस्यांमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मनमोहन सिंग, पी चिदंबरम या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. यासह महाराष्ट्रातून अशोक चव्हाणांना या समितीत स्थान मिळालंय.

CWC
CWC
author img

By

Published : Aug 20, 2023, 4:28 PM IST

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांच्या (CWC) नावांची घोषणा केली. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी या तिघांचाही यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे, खरगे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शथी थरूर यांनाही कार्यकारणीत स्थान दिलंय. मल्लिकार्जुन खरगे यांच्या उमेदवारीला थरूर यांनी आव्हान दिले होते.

सचिन पायलट यांनाही स्थान मिळाले : खरगे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अधीर रंजन चौधरी आणि पी चिदंबरम यांनाही CWC मध्ये स्थान दिलंय. तर राजस्थानमध्ये बंडखोरी करणाऱ्या सचिन पायलट यांचाही या नव्या टीममध्ये समावेश करण्यात आलाय. याशिवाय पवन खेडा, सुप्रिया श्रीनेत, अलका लांबा, यशोमती ठाकूर या प्रमुख चेहऱ्यांनाही CWC मध्ये स्थान मिळालंय.

CWC सदस्य पुढीलप्रमाणे : मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी, एके अँटनी, अंबिका सोनी, मीरा कुमार, दिग्विजय सिंह, पी चिदंबरम, तारिक अन्वर, लाल थनहवला, मुकुल वासनिक, आनंद शर्मा, अशोक चव्हाण, अजय माकन, चरणजीत सिंग चन्नी, प्रियांका गांधी वड्रा, कुमारी सेलजा, गायखंगम, एन रघुवीर रेड्डी, शशी थरूर, ताम्रध्वज साहू, अभिषेक मनु सिंघवी, सलमान खुर्शीद, जयराम रमेश, जितेंद्र सिंग, रणदीप सुरजेवाला, सचिन पायलट, दीपक बाबरिया, जगदीश मीर ठाकोर, गुलाम अहमद मीर, अविनाश पांडे, दीपा दासमुन्शी, महेंद्रजित सिंग मालवीय, गौरव गोगोई, सय्यद नासिर हुसेन, कमलेश्वर पटेल आणि केसी वेणुगोपाल.

स्थायी आमंत्रित सदस्य : वीरप्पा मोईली, हरीश रावत, पवन कुमार बन्सल, मोहन प्रकाश, रमेश चेन्निथला, बीके हरिप्रसाद, प्रतिभा सिंग, मनीष तिवारी, तारिक अहमद कर्रा, दीपेंद्र हुडा, गिरीश चोडणकर, टी सुब्बरामी रेड्डी, के. राजू, चंद्रकांता हंडोरे, मीनाक्षी नटराजन, फुलो देवी नेताम, दामोदर राजा नरसिंहा, सुदीप रॉय बर्मन, ए चेल्लाकुमार, भक्त चरण दास, अजय कुमार, हरीश चौधरी, राजीव शुक्ला, मणिकम टागोर, सुखजिंदर रंधावा, माणिकराव ठाकरे, रजनी पटेल, गुरदीप सप्पल, सचिन राव, देवेंद्र यादव आणि मनीष चतरथ.

विशेष आमंत्रित सदस्य : पल्लम राजू, पवन खेडा, गणेश गोदियाल, कोडिकुनिल सुरेश, यशोमती ठाकुर, सुप्रिया श्रीनेत, परिनीति शिंदे, अलका लांबा आणि वीसी रेड्डी.

CWC पक्षाचे धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था : काँग्रेस कार्यकारिणी (CWC) ही पक्षाचे धोरण ठरवणारी सर्वोच्च संस्था आहे. पक्षाने घेतलेल्या सर्व निर्णयांमध्ये CWC महत्त्वाची भूमिका बजावते. निवडणुकीच्या काळात कोणत्या उमेदवाराला तिकीट देण्याचा निर्णय असो किंवा इतर कोणत्याही पक्षासोबत युती करण्याचा निर्णय असो, त्यात सीडब्ल्यूसीची भूमिका मोठी असते.

हेही वाचा :

  1. Rahul Gandhi Pay Tribute To Rajiv Gandhi : राहुल गांधींनी पँगॉग तलावाकाठी वडील राजीव गांधींना वाहिली आदरांजली
  2. Rahul Gandhi : ठरलं! राहुल गांधी 'या' मतदारसंघातून लढवणार लोकसभेची निवडणूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.