ETV Bharat / bharat

खासदार कार्ती चिदंबरम पुन्हा ईडीसमोर हजर, जाणून घ्या काय आहे प्रकरण - Visa money laundering

Karti Chidambaram : काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम मंगळवारी ईडीसमोर हजर झाले. ईडी चायनीज व्हिसा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांची चौकशी करत आहे. वाचा संपूर्ण बातमी...

Karti Chidambaram
Karti Chidambaram
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 4:56 PM IST

नवी दिल्ली Karti Chidambaram : २०११ मध्ये काही चिनी नागरिकांना व्हिसा जारी करण्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम मंगळवारी (2 जानेवारी) ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले. या प्रकरणी त्यांची गेल्या वर्षी 23 डिसेंबर रोजी चौकशी करण्यात आली होती. ईडीनं 52 वर्षीय कार्ती चिदंबरम यांचं मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार म्हणणं नोंदवलं होतं.

कार्ती चिदंबरम यांची प्रतिक्रिया : कार्ती चिदंबरम आज मध्य दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात हजर झाले. तेथे जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांना सांगितलं की, ही सामान्य गोष्ट आहे. विशेषत: निवडणुका जवळ आल्यावर या गोष्टी नियमितपणे घडतात, असं ते म्हणाले. हे सर्व व्यर्थ आहे. आम्ही हे योग्यरित्या हाताळू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

काय आरोप आहे : सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या (CBI) एफआयआरनुसार, वेदांत समूहाची कंपनी तलवंडी साबो पॉवर लिमिटेड (टीएसपीएल) च्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं कार्ती आणि त्यांचा जवळचा सहकारी एस. भास्कर रमण यांना 50 लाख रुपये लाच दिल्याच्या आरोप आहे. टीएसपीएल पंजाबमध्ये पॉवर प्लांट उभारत होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, वीज प्रकल्प उभारण्याचं काम एका चिनी कंपनीकडून केलं जात होतं. मात्र हे काम निर्धारित वेळेपेक्षा हळू सुरू होतं.

यापूर्वीही झाली चौकशी : सीबीआयच्या एफआयआरनुसार, टीएसपीएलच्या एका कार्यकारिणीनं 263 चिनी कामगारांसाठी प्रकल्प व्हिसा पुन्हा जारी करण्याची मागणी केली होती. यासाठी 50 लाख रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप आहे. सीबीआयनं गेल्या वर्षी चिदंबरम कुटुंबीयांच्या मालमत्तांवर छापे टाकून भास्कररामन यांना अटक केली होती. तर कार्ती चिदंबरम यांची चौकशी करण्यात आली होती.

हे वाचलंत का :

  1. इंडिया आघाडीचा व्हीव्हीपॅटवर सवाल; निवडणूक आयोगाला जयराम रमेश यांचं पत्र
  2. कुस्ती परिषदेचा 'आखाडा': निलंबन मान्य नाही, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा घेणार; संजय सिंह यांचं सरकारला आव्हान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.