सुरत (गुजरात) : 2019 च्या मानहानीच्या खटल्यात सुरत न्यायालयाने कॉंग्रेस नेते राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा मिळाल्यानंतर राहुल गांधी सुरतमधील एका रेस्टॉरंटमध्ये दिसले. त्यांनी अचानक या रेस्टॉरंटमध्ये पोहोचून गुजराती थाळीचा आस्वाद घेतला. थाळीतील तूर आणि मिश्रित डाळीची भाजी त्यांना इतकी आवडली की त्यांनी चक्क 6 वाट्या भाजी खाल्ली!
न्यायालयीन प्रक्रियेनंतर रेस्टॉरंटमध्ये पोहोचले : काँग्रेस नेते राहुल गांधी सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुजराती थाळी खाण्यासाठी अचानक रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे कार्यकर्तेही होते. येथे त्यांनी गुजराती भाखरीची मागणी केली. राहुल गांधींना तेथील मिठाई देखील आवडली आणि त्यांनी त्याचे कौतुकही केले. जेवणानंतर त्यांनी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांसोबत फोटो देखील काढले. हॉटेलचे मालक संजय गजेरा म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी जेवायला आले होते. त्यांनी खास गुजराती थाळी मागवली. ते इथे जेवायला येणार आहेत, हे आम्हाला कुणीच सांगितलं नाही. आम्ही ऐकले होते की ते दुसऱ्या ठिकाणी जेवायला जाणार होते, पण त्यांनी येथे येऊन गुजराती थाळी मागवली.
एकच भाजी सहा वेळा मागवली : ते पुढे म्हणाले की, 'राहुल गांधींच्या गुजराती थाळीत दोन प्रकारच्या मिठाई होत्या. थाळीत रबडीसोबत मूग डाळ हलवा होता. हलवा त्यांना खूप प्रिय आहे. त्याचबरोबर त्यांना थाळीतही तूरीची भाजीही आवडली. ही भाजी त्यांनी 6 वेळा मागवली. थाळीत बीन्स आणि मटारची भाजी देखील होती. ती दही आणि चण्याच्या पीठाने तयार केले जाते. त्याची चव आंबट, गोड आणि तिखट असते. त्यांना ही भाजी त्यांना इतकी आवडली की त्यांनी ती पुन्हा पुन्हा मागविली. आम्ही ही भाकरी रात्रीच्या वेळी वाढतो, मात्र त्यांनी सकाळच्या जेवणातच ही भाकरी मागितली'.
हे ही वाचा : Kolar MP On Rahul Gandhi : राहुल गांधींनी वादग्रस्त वक्तव्य केलेल्या मतदारसंघातील भाजप आमदार म्हणाले, लायकी...