पणजी ( गोवा ) : काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी उद्या ( सोमवार ) गोव्यात ( Priyanka Gandhi Goa Visit ) येत असून, नुवेसह कुंभारजुवे व पणजी मतदारसंघात त्या घरोघरी प्रचारात सहभागी होणार आहेत. नुकतेच काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी गोव्यात येत घरोघरी प्रचारात सहभाग घेतला ( Rahul Gandhi Goa Visit ) होता.
पुन्हा एकदा गोव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावणार
नुकताच राहुल गांधी यांनी गोव्याचा दौरा केला होता. त्यात त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन केले होते. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला होता. त्यात प्रियांका गांधी यांच्या दौऱ्याने काँग्रेस पक्षाला राज्यात अधिकच बळ मिळणार असल्याचा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे.
राहुल गांधींची घोषणा
गोवा राज्यासाठी नवीन न्याय योजना सुरू करण्यात येणार आहे. ( Nyay Scheme will be launched Goa ) या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरिबांना महिन्याला 6 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी ( Gongress leader Rahul Gandhi ) यांनी नुकतेच त्यांच्या दौऱ्यात केली होती. त्यामुळे प्रियांका गांधी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उमेदवारांना दिली आहे शपथ
निवडून आल्यावर आमदार फुटून दुसऱ्या पक्षात जाऊ नये यासाठी सर्व उमेदवारांना नुकतेच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत शपथ देण्यात (Congress Candidate Oath of loyalty) आली. गोवा इंटरनॅशनल सेंटर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रत्येक उमेदवाराला ही शपथ देण्यात आली. याआधी काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना पणजीत महालक्ष्मी मंदिरात पक्ष न सोडण्याची छपथ दिली होती.