श्रीनगर - गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोनिया गांधींना पत्र लिहिलेले 23 नेते पुन्हा एकदा जम्मूत एकत्र जमले आहेत. जम्मूत शांती संमेलन आयोजीत करण्यात आले आहेत. यावेळी राज बब्बर यांनी संबोधित केले. आम्हाला जी -23 म्हटलं जात आहे. मात्र, आम्ही गांधी-23 आहोत. देशाचा कायदा आणि राज्यघटना महात्मा गांधींच्या विश्वासाने, दृढनिश्चयाने आणि विचारांनी बनविल्या गेल्या. त्यांना पुढे नेण्यासाठी काँग्रेस ठामपणे उभी आहे. आमचा उद्देश काँग्रेसला बळकट करण्याचा आहे. त्यावर आम्ही काम करणार आहोत, असे बब्बर म्हणाले.
राज बब्बर यांच्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेता कपिल सिब्बल यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची प्रशंसा केली. गुलाम नबी आझाद हे एक अनुभवी नेता आहेत. मात्र, आजपर्यंत काँग्रेसने त्याचा फायदा करून घेतला नाही. हे मला अद्याप समजले नाही, असे सिब्बल म्हणाले.
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनीही शांती संमेलनाला संबोधीत केले. यावेळी ते म्हणाले, की काँग्रेसमध्ये दोन गट आहेत. एक ज्यांच्यामध्ये काँग्रेसमध्ये आहेत. तर दुसरे काँग्रेसच्या आत आहेत. गुलाम नबी आझाद यांच्यामध्ये काँग्रेस आहेत. काँग्रेसला मजबूत करण्यासाठी आपण सर्व जण एकत्र जमलो आहेत. जर काँग्रेस मजबूत राहिली, तरच देश मजबूत राहील, असे हुड्डा म्हणाले.
काँग्रेस नेता आनंद शर्मा यांनी गेल्या एका दशकात काँग्रेस कमकुवत झाल्याचे म्हटलं. काँग्रेसला मजबूत करणे, आमचे ध्येय आहे. इथपर्यंत पोहचण्यासाठी आपण सर्वांनी मोठा प्रवास आणि मेहनत केली आहे. आपण सर्व जण युवा आंदोलन, विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून आलो आहोत. आपल्या सर्वांचा काँग्रेसच्या शक्ती आणि एकतेत विश्वास आहे, असे आनंद शर्मा म्हणाले.