ETV Bharat / bharat

Hyderabad CWC Meeting Kharge : '2024 च्या निवडणुकीत भाजपाचा पराभव करणं आमचं ध्येय, CWC बैठकीत भाजपावर प्रहार - हैदराबाद येथील CWC बैठक

लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका या वर्षाच्या अखेरीस होणार आहेत. त्यामुळं या सर्व राज्यांमध्ये तसंच जम्मू-काश्मीरमधील संभाव्य विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसनंही तयार राहावे, असं आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. ते आज हैदराबाद येथील CWC बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

Hyderabad CWC Meeting Kharge
Hyderabad CWC Meeting Kharge
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 6:17 PM IST

हैदराबाद : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी CWC बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करताना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याचं आवाहन केलंय. पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाला देशातील लोकशाहीच्या अस्तित्वाची चिंता आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करणं काँग्रेसच लक्ष असल्याचं त्यांनी म्हटलंय.

खर्गेंनी साधला भाजपावर निशाना : दुसऱ्या दिवशी काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीला संबोधित करताना खर्गे म्हणाले, "आम्हाला सर्वांनाच समोर असलेल्या आव्हानांची जाणीव आहे. ही आव्हानं केवळ काँग्रेसची नाहीत, तर ती भारतीय लोकशाहीच्या अस्तित्वाची आव्हाने आहेत. भारतीय राज्यघटनेचं जतन करण्यात केंद्रातील भाजपा सरकारवर अपयशी ठरलीय. महाराष्ट्रातील मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर भाजपा सरकारनं 'एक राष्ट्र, एक निवडणूक' या विषयावर समिती स्थापन केली. त्यावरूनही काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी भाजपावर हल्लाबोल केलाय.

भाजपाचा पराभव करणं आमचं लक्ष : भाजपानं वन नेशन वन इलेक्शनसाठी अजेंड्यासाठी सर्व परंपरा मोडून काढल्या आहेत. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली, असा त्यांनी आरोप केला. काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष असून काँग्रेसनं संविधानाचा पाया रचला. आपण संविधानाचं रक्षण केलं पाहिजे. आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं लागेल. आमचं ध्येय भाजपाचा पराभव करणं हेच असलं पाहिजे असंदेखील खर्गे बैठकीत म्हणाले. 2024 च्या लोकसभा निवडणुका देशात पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम करण्याचं आवाहनदेखील त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलंय.

2024 मध्ये महात्मा गांधींच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीची शताब्दीही पूर्ण होणार आहे. त्यामुळं भाजपाला सत्तेतून खाली खेचून काँग्रेसला सत्तेत आणणं हीच महात्मा गांधींना खरी श्रद्धांजली ठरेल असं खर्गे म्हणाले. छत्तीसगड, राजस्थानमधील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारनं सामाजिक न्याय, कल्याणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. आपण या कल्याणकारी योजनांचा देशभर प्रचार केला पाहिजे- काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे

हेही वाचा -

  1. Manipur Violence CWC Meeting : मणिपूर हिंसाचारात भाजपानं तेल ओतलं, काँग्रेसनं भाजपाला धुतलं
  2. Narendra Modi Birthday : पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित्त दिल्या संस्कृतमध्ये शुभेच्छा, Watch Video
  3. Narendra Modi Birthday : गुजरातचे मुख्यमंत्री ते जागतिक नेते, जाणून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थक्क करणारा प्रवास!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.