ETV Bharat / bharat

Congress Worried On Pawar : शरद पवारांच्या हस्ते पंतप्रधान मोदींचा सत्कार - काँग्रेस चिंतेत - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

केंद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांनी एकत्र येत 'इंडिया' गटाची स्थापना केली आहे. याच दरम्यान मंगळवार 1 ऑगस्ट रोजी पुण्यात एका पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सहभागी होत आहेत. त्यांच्या हस्ते मोदींचा सत्कार होणार आहे. त्यामुळे पवारांनी शरणागती पत्करली की काय, असा संभ्रम काँग्रेसमध्ये निर्माण झाला आहे. 'ईटीव्ही भारत'चे अमित अग्निहोत्रीं यांचा रिपोर्ट. (Congress Worried On Pawar)

Sharad Pawar, Prime Minister Modi
शरद पवारांच्या, पंतप्रधान मोदी
author img

By

Published : Jul 31, 2023, 5:49 PM IST

नवी दिल्ली: विरोधक आणि सत्ताधारी भाजपमध्ये कडाक्याचे शब्दयुद्ध सुरू असताना, 1 ऑगस्ट रोजी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मित्रपक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सत्कार होणार असल्या बद्दल काँग्रेस चिंतेत आहे. काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांच्या मते, शरद पवार भाजपवर नाराज असण्याची अनेक कारणे आहेत. भाजपने अलीकडेच राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली आहे, शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख सदस्य आहेत. ज्यांना गेल्या वर्षी सत्तेतून बाहेर काढण्यात आले होते. आणि ते नवीन विरोधी आघाडी 'इंडिया' गटात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत ज्यांचे ध्येय आहे की 2024 च्या राष्ट्रीय निवडणुकीत भाजपला सत्ते पासून दुर ठेवणे.

पंतप्रधान मोदींना पुरस्कार देणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे “टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट (हिंद स्वराज संघ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1 ऑगस्ट रोजी 103 व्या पुण्यतिथीला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करेल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. हा पुरस्कार स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र आहे आणि पंतप्रधान मोदींच्या "सर्वोच्च नेतृत्वासाठी आणि नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी" हा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

योगायोगाने, पुणे येथे हा पुरस्कार सोहळा 'इंडिया' गटाच्या तिसर्‍या बैठकीच्या काही आठवडे आधी होत आहे. 'इंडिया' गटाच्या बैठकिचे आयोजन शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि कॉंग्रेस करणार आहे. आम्हाला पवारसाहेबांची पूर्ण काळजी आहे. त्यांच्या मनात काय चालले आहे हे मी समजू शकत नाही. अचानक, त्यांनी लढणे बंद केले आहे. त्यांनी त्मसमर्पण केले आहे की त्यांच्यावर दबाव आहे, आम्हाला माहित नाही? या पुरस्कार कार्यक्रमामुळे पक्षांतर्गत चिंता वाढली आहे, परंतु या प्रकरणावर निर्णय घेणे हे हायकमांडचे काम आहे अशी प्रतिक्रिया एआयसीसीच्या एका वरिष्ठ नेत्याने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी म्हणले आहे की, पुण्यातील पुरस्कार सोहळ्यात शरद पवार यांची उपस्थिती असणार आहे. जिथे पंतप्रधान मोदींचा गौरव केला जाणार आहे. हा एका खाजगी ट्रस्टने आयोजित केलेला खाजगी कार्यक्रम आहे. मी त्यावर भाष्य करू इच्छित नाही. मात्र त्याचा विरोधी एकजुटीवर परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीचे सगळे 'इंडिया' गटाच्या बैठकीलाउपस्थित राहतील.

पुण्यातील खाजगी ट्रस्ट गेल्या अनेक दशकांपासून पक्षाच्या जवळच्या व्यक्तींद्वारे चालवला जात आहे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे हे ट्रस्टी आहेत. सूत्रांनी सांगितले की, सुरुवातीला विश्वस्तांनी पंतप्रधानांना निमंत्रण पाठवले होते, पण ते नाखूष होते. त्यानंतर विश्वस्तांनी शरद पवारांना जोडले आणि त्यांनी पंतप्रधानांना हा पुरस्कार स्वीकारण्यास राजी केले.

माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले की, पंतप्रधान हताश दिसत होते. “मी कोणत्याही विद्यमान पंतप्रधानांना खाजगी ट्रस्टकडून पुरस्कार स्वीकारताना पाहिलेले नाही. न ऐकले आहे. पंतप्रधानांनी हा पुरस्कार स्वीकारण्या मागचा हेतू काय? ते प्रसिद्धीसाठी हतबल आहेत का? लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र हरण्याची त्यांना इतकी भीती वाटते का,” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पुरस्कार पंतप्रधानांना विश्वस्तांपैकी एकाकडून दिला जात असला तरी, शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे या दोघांनाही या कार्यक्रमाला उपस्थित राहावे लागेल. पुणे लोकसभा पोटनिवडणूक प्रलंबित असल्याने खाजगी ट्रस्टमधील कोणीतरी भाजपचे तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत आहे का, असा प्रश्न काँग्रेसच्या आंतरजनांना पडला आहे. विद्यमान सदस्य गिरीश बापट यांचे २९ मे रोजी निधन झाल्याने ही जागा रिक्त आहे. पुढील लोकसभा निवडणुकीला एक वर्षांपेक्षा कमी कालावधी असताना पोटनिवडणूक घेण्याबाबत निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.