ETV Bharat / bharat

पंजाब काँग्रेसमधील धुसफूस कायम, माजी आमदाराचा कॅबिनेट मंत्र्यावर गंभीर आरोप - Navjot Singh Sidhu

काँग्रेसमधील वाद काही संपण्याचे नाव घेत नाही. नुकतेच नवज्योत सिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा वाद सर्वांनी पाहिला. त्यानंतर कायम धुसफूस सुरूच आहे. आता काँग्रेसचे माजी आमदार अश्वनी सेखडी यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री तृप्त राजिंदर सिंह बाजवा यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.

पंजाब काँग्रेसमधील धुसफूस कायम
पंजाब काँग्रेसमधील धुसफूस कायम
author img

By

Published : Nov 7, 2021, 3:05 AM IST

गुरदासपुर (पंजाब) - पंजाब काँग्रेसमधील वाद काही संपण्याचे नाव घेत नाही. नुकतेच नवज्योत सिंग सिद्धू आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा वाद सर्वांनी पाहिला. त्यानंतर कायम धुसफूस सुरूच आहे. आता काँग्रेसचे माजी आमदार अश्वनी सेखडी यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री तृप्त राजिंदर सिंह बाजवा यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मंत्री बाजवा काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप सेखरी यांनी केला आहे.

अश्वनी सेखडीच्या यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, नवज्योत सिंग सिद्धू आणि हरीश चौधरी यांच्यासोबत बैठक झाली होती. उपमुख्यमंत्री ओपी सोनी ज्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार होते त्याचे उद्घाटनही मंत्री बाजवा यांच्या हस्ते झाले. असा आरोपही त्यांनी केला आहे. सेखरी म्हणाले की, मंत्री बाजवा यांचे 10 विधानसभा मतदारसंघात वर्चस्व आहे.

तृप्त राजिंदर बाजवा यांचे अनेक दहशतवादी आणि गुंडांशी संबंध असल्याचा आरोप सेखडी यांनी केला आहे. तसेच, बाजवा हे अकाली दलाचे एजंट असल्याचा आरोपही त्यांनी केला. सेखडी म्हणाले की मंत्री बाजवा आणि शिरोमणी अकाली दलाचे आमदार लखबीर लोधी नांगल बटालाच्या जनतेला मूर्ख बनवत आहेत. याबाबत पक्षाच्या हायकमांडला पत्र लिहून तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणावर मंत्री तृप्त राजिंदर सिंह बाजवा म्हणाले आहेत की मी माझ्या मतदारसंघ फतेहगढ चुडियातून निवडणूक लढवणार आहे. परंतु, बटालाचा प्रश्न आहे, तेथून कोण उमेदवार असेल हे हायकमांड ठरवेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.