ETV Bharat / bharat

LPG Cylinder Prices Increase :सणासुदीत केंद्र सरकारनं फोडला महागाईचा बॉम्ब, वाढले गॅस सिलिंडरचे दर - LPG Cylinder Prices Increase

प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात येतात. त्याचप्रमाणं आजदेखील गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. (LPG Cylinder Price Hike )

LPG Cylinder Prices Increase
LPG Cylinder Prices Increase
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 8:41 AM IST

नवी दिल्ली - पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक गॅसे सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर सुमारे १०० रुपयांनी वाढविले आहेत. नोव्हेंबरमध्ये दिवाळीचा सण असताना पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरचे दर वाढविले आहेत. या दरवाढीची झळ हॉटेल व्यावसायिकांसह ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे.

दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरचे बदलले दर आजपासून लागू होणार आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेश लि. कंपनीच्या आकडेवारीनुसार दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरचा दर आजपासून १,८३३ रुपये असणार आहे. यापूर्वी हा सिलिंडर १,७३१ रुपये दर होता. मुंबईत गॅस सिलिंडरचा दर १,६८४ रुपयावरून १,७८५.५० वर पोहोचला. कोलकात्यात गॅस सिलिंडरचा दर हा १८३९.५० वरून १,९४३ वर पोहोचला. तर चेन्नईत गॅस सिलिंडरचा आजपासून १९९९.५० रुपये होणार आहे. यापूर्वी चेन्नईत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर हा १,८९८ रुपये होता.

जागतिक बाजारपेठेतील दराप्रमाणं बदलतात दर- गेल्या महिन्यात केंद्र सरकारनं उज्जला योजनेतून देण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली होती. उज्जवला योजनेतील लाभार्थी महिलांना सवलत मिळण्यासाठी हा निर्णय घेतला होता. गेल्या महिन्यातदेखील व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढले होते. ऑक्टोबरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर २०० रुपयांहून अधिक वाढले होते. जागतिक बाजारपेठेतील दराप्रमाणे सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून गॅस सिलिंडरचे दर बदलण्यात येतात. सप्टेंबर महिन्यात डिझेलच्या विक्रीत घसरण झाली होती. सर्वसाधारणपणे मान्सूनच्या काळात डिझेलच्या विक्रीत घसरण होते. कारण मान्सूनमध्ये कृषी क्षेत्रामधून डिझेलची मागणी कमी असते.

दोन महिन्यात असे वाढले गॅस सिलिंडरचे दर- दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत ऑक्टोबरमध्ये १,८३३ रुपये व सप्टेंबरमध्ये १,७३१ रुपये होती. मुंबईमध्ये गॅस सिलिंडरचे दर ऑक्टोबरमध्ये १७८५.५० रुपये, सप्टेंबरमध्ये १,६८४ रुपये होते. कोलकात्यात ऑक्टोबरमध्ये गॅस सिलिंडरची किंमत १,९४३ रुपये, तर सप्टेंबरमध्ये सिलिंडरचा दर १८३९.५० रुपये होता. चेन्नईमध्येही गॅस सिलिंडरचा ऑक्टोबरमध्ये दर १९९९.५० रुपये तर सप्टेंबरमध्ये १८९८ रुपये होता.

या ठिकाणी होतो व्यावसायिक सिलिंडरचा वापर- केंद्र सरकारकडून घरगुती गॅस सिलिंडरची सवलतीच्या दरात विक्री करण्यात येते. तर व्यावसायिक सिलेंडरसाठी कोणतीही सवलत नसल्यानं या सिलिंडरचे दर घरगुती सिलिंडरच्या तुलनेत अधिक असतात. व्यावसायिक सिलिंडर हॉटेल, खासगी आस्थापना किंवा इतर व्यावसायिक संस्थांमध्ये वापरण्यात येतात. घरगुती सिलिंडरचा अशा खासगी आस्थापनांमध्ये वापर करण्यावर सरकारनं निर्बंध घातले आहेत.

हेही वाचा-

  1. Hike in Commercial LPG Cylinder : महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका! व्यावसायिक एलपीजी गॅससह हवाई प्रवास महागला
  2. Commercial LPG Prices : व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती झाल्या स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.