मोरबी ( गुजरात ): गुजरातमधील मोरबी शहरातील मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळून 132 जणांचा मृत्यू (Collapsed Morbi suspension bridge) झाला. एका खासगी कंपनीने सात महिन्यांच्या दुरुस्तीच्या कामानंतर पाच दिवसांपूर्वीच पुन्हा लोकांसाठी खुला केला होता. परंतु त्याला पालिकेचे 'फिटनेस प्रमाणपत्र' मिळाले (bridge fitness certificate) नव्हते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. राज्याची राजधानी गांधीनगरपासून सुमारे 300 किमी अंतरावर असलेल्या मोरबी शहरातील शतकाहून अधिक जुना पूल रविवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास लोकांच्या गर्दीने (132 people killed in morbi bridge collapse) कोसळला.
नूतनीकरणानंतर पूल खुला : ओरेवा कंपनीला हा पूल 15 वर्षांपासून ऑपरेशन आणि देखभालीसाठी देण्यात आला होता. यावर्षी मार्चमध्ये तो नूतनीकरणासाठी बंद करण्यात आला होता. 26 ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या गुजराती नववर्षाच्या दिवशी नूतनीकरणानंतर तो पुन्हा खुला करण्यात आला, असे मोरबी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी डॉ. संदीपसिंह (Morbi suspension bridge lacked fitness certificate) म्हणाले.
फिटनेस प्रमाणपत्र नाही : नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पूल लोकांसाठी खुला करण्यात आला. परंतु स्थानिक नगरपालिके अद्याप फिटनेस प्रमाणपत्र दिलेले नाही. 19 व्या शतकाच्या शेवटी बांधण्यात आलेला हा 'अभियांत्रिकी चमत्कार' होता. जिल्हाधिकार्यांच्या माहितीनुसार, झुलता पूल 'मोरबीच्या राज्यकर्त्यांचा प्रगतीशील आणि वैज्ञानिक स्वभावाचे' प्रतिबिंबित्व करतो, असे म्हटले (Morbi suspension bridge) जाते.
कलात्मक आणि तांत्रिक चमत्कार : 1922 पर्यंत मोरबीवर राज्य करणारे सर वाघजी ठाकोर पाश्चात्य वसाहती प्रभावाने प्रेरित झाले होते. त्यांनी दरबारगड पॅलेसला नजरबाग पॅलेसशी जोडण्यासाठी त्या काळातील 'कलात्मक आणि तांत्रिक चमत्कार' म्हणजे हा पूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. हा पूल 1.25 मीटर रुंद आणि 233 मीटर लांब होता. युरोपमध्ये त्या काळात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोरबीला एक अनोखी ओळख देण्यासाठी हा पूल बांधण्यात आला (suspension bridge on Machchhu river in Gujarat) होता.