ETV Bharat / bharat

भारताच्या समृद्ध परंपरा पुढे नेण्यात 'सेक्युलॅरिझम' सर्वात मोठा अडथळा - योगी आदित्यनाथ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

भारत आणि भारतीय संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीका केली. धर्मनिरपेक्षता (सेक्युलॅरिझम) हा शब्द भारताच्या समृद्ध परंपरा पुढे नेण्यासाठी आणि जागतिक व्यासपीठावर स्थान मिळविण्यात सर्वात मोठा अडथळा आणि धोका ठरत असल्याचे ते म्हणाले.

योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ
author img

By

Published : Mar 7, 2021, 8:21 AM IST

लखनऊ - धर्मनिरपेक्षता (सेक्युलॅरिझम) हा शब्द भारताच्या समृद्ध परंपरा पुढे नेण्यासाठी आणि जागतिक व्यासपीठावर स्थान मिळविण्यात सर्वात मोठा अडथळा आणि धोका ठरत आहेत. आपण यावर मात करून अत्यंत शुद्ध व सात्विक मनाने प्रयत्न केले पाहिजेत, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. लहान-लहान जातीय भांडणातून आपण आपले वैभव नष्ट केले. आपण या छोट्या-छोट्या गोष्टींमधून बाहेर पडून जगासमोर स्वतःला उभ केलं पाहिजे, असेही ते म्हणाले. रामायण विश्वकोशच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.

हा विश्वकोश आपल्याला अयोध्येत जाण्यास भाग पाडेल. आपल्याला विज्ञान आणि अध्यात्म या पैलूंची ओळख करुन देईल, असे ते म्हणाले. यावेळी भारत आणि भारतीय संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली. कंबोडियाच्या भेटीदरम्यान अंकोरवाट मंदिराची माहिती देणाऱ्या एका बौद्ध मार्गदर्शकाचे उदाहरण देऊन मुख्यमंत्र्यांनी हिंदू संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना योग्य उत्तर दिले. मंदिराची माहिती देणारा व्यक्ती हा बौद्ध होता. परंतु, बौद्ध धर्माची उत्पत्ती हिंदू धर्मातून झाली हे देखील त्यांना माहित होते. हे तो आत्मविश्वासाने बोलू शकतो, परंतु तो तेच वाक्य भारतात बोलला तर बर्‍याच लोकांच्या धर्मनिरपेक्षतेला धोका निर्माण होईल, अशी खोचक टीका त्यांनी केली.

कुंभ, मानवतेचा अमूर्त वारसा -

कुंभने भारताची संस्कृती, स्वच्छता, सुव्यवस्था आणि सुरक्षा यांचे नवीन मानक सादर केले. कुंभ हा मानवतेचा अमूर्त वारसा आहे, हे युनेस्कोनेही म्हटलं आहे. भारताच्या परंपरेवर कोणता देश असा आहे की ज्याला अभिमान वाटत नाही. इंडोनेशिया, थायलँड, लाओस, कंबोडिया, हे सर्व देश परंपरा आणि संस्कृतीशी मोठ्या आत्मविश्वासाने जोडले गेले आहेत. रामायण आणि महाभारताच्या कथा आपल्याला बरेच काही शिकवतात, असे योगी म्हणाले. काही लोकांनी राम यांच्या अस्तित्वावर आणि अयोध्यावरही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही, जेव्हा श्री राम जन्मस्थळासाठी मोहीम सुरू होती. तेव्हा अनेक इतिहासकार प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करीत होते. जिथे रामाचा जन्म झालेला ती आयोध्या ही नाही, असे बऱ्याच लोकांनी म्हटलं होते. या विकृत मानसिकतेने नेहमीच भारताला आपल्या अभिमानापासून वंचित ठेवले आहे, अशी टीका त्यांनी केली. भारताविरूद्ध वातावरण निर्माण करणाऱ्या मोजक्या लोकांना काही पैसे मिळतात. पण जगात त्यांची काहीच किंमत नाही. देशाचा विश्वासघात करणारी ही लोक आहेत. त्यांनी थोड्या पैशासाठी आपला आत्मा विकलाय, असे योगी म्हणाले.

आपल्या भाषणात आयोध्या संशोधन संस्थेचे कौतुक योगींनी केले. हा प्रस्ताव फक्त २ वर्षांपूर्वी मला देण्यात आला होता. ही अभिमानाची बाब आहे की भारताच्या सनातन हिंदुत्व परंपरेतील सात पवित्र शहरांपैकी तीन अयोध्या, मथुरा आणि काशी उत्तर प्रदेशात आहेत. सनातन हिंदू धर्माचा आत्मा येथे राहतो, असे ते म्हणाले.

रामायण विश्वकोशच्या पहिल्या आवृत्तीचे ई-बुक -

विशेष म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार अयोध्या संशोधन संस्थेने संस्कृती विभागाच्या नेतृत्वात तयार केलेल्या रामायण विश्वकोशच्या पहिल्या आवृत्तीचे ई-बुक देखील सुरू केले. रामायण विश्व महाकोशची पहिली आवृत्ती इंग्रजी भाषेत प्रसिद्ध झाली. जगातील 205 देशांतील रामायणातील मूर्त व अमूर्त वारसा एकत्र करून रामायण विश्व महाकोश प्रकल्प साकार करण्यासाठी संस्कृती विभाग सहभागी आहे. जागतिक विश्वकोशाची पहिली आवृत्ती भारतीय तंत्रज्ञान संस्था, खडगपूर यांनी तयार केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.