लखनऊ - २०२२ मध्ये होऊ घातलेल्या आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी जोर धरला आहे. एआआयएमने उत्तरप्रदेश विनाधनासभा निवडणुकीत १०० उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे. तसेच या निवडणुकीत भाजपा आणि योगी आदित्यनाथ यांना सत्तेतून बेदखल करण्याचे आव्हान ओवैसी यांनी दिले होते. यावर प्रतिक्रिया देताना योगी आदित्यनाथ यांनी ओवैसी हे देशातील महान राजकारणी असल्याची खोचक टीका करत त्याचे आव्हान स्वीकारत असल्याचे स्पष्ट केले. तसेच यूपीमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार असल्याचाही दावा त्यांनी याेवळी केला.
विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी होऊन पुन्हा सत्ता बनवेल -
ओवैसी यांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी थेट प्रतिक्रिया दिली. ओवैसी हे देशातील एक मोठे राजकारणी आहेत. त्यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला बेदखल करण्याची गोष्ट करून भाजपा कार्यकर्त्यांना आव्हान दिले आहे. भाजपाने त्यांच्या या आव्हानाचा स्वीकार केला आहे. मात्र यामध्ये कोणतीही शंका नाही की आगामी निवडणुकीत भाजपाच विजयी होईल आणि उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता स्थापन होईल.
AIMIM च्या सोबत भागीदारी संकल्प मोर्चा -
एमआयएमने सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे प्रमुख ओम प्रकाश राजभर यांच्या सोबत युती केली आहे. 'भागीदारी संकल्प मोर्चा' च्या माध्यमातून ओम प्रकाश राजभर यांनी उत्तरप्रदेश मधील छोट्या पक्ष, संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ओम प्रकाश राजभर हे ओवैसी यांच्या मदतीने उत्तरप्रदेशात सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहत आहेत. मागील दिवसात त्यांनी याबाबतचा आराखडाही माध्यमासमोर मांडला होता. ज्यामध्ये त्यांनी पाच वर्षात पाच मुख्यमंत्री आणि २० उपमुख्यमंत्री बनवायचे म्हटले होते.
AIMIM ने निवडणुकीत १०० जागांची केली घोषणा
हैदराबादचे खासदार असलेले असदुद्दीन ओवैसी यांनी ट्वीट करून अशी घोषणा केली आहे की, त्यांचा पक्ष हा उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी त्यांनी उत्तरप्रदेश येथे १०० जागांवर आपले उमेदवार लढवण्याचे ठरवले आहे. पक्षाने उमेदवारांना निवडण्याचे काम सुरू केले आहे, त्याचे आवेदन पत्रही प्रसिद्ध केले आहे.
त्यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, राजभर यांच्या 'भागीदारी संकल्प मोर्चा' च्या सोबत आहेत. आपली अन्य कोणत्याही पक्षासोबत युतीची बोलणी झालेली नाहीत. बिहार विधानासभा निवडणूकीत एआईएमआईएम ने २० जागा लढवल्या होत्या आणि पाच जागेवर विजयही मिळवला होता.