ETV Bharat / bharat

Violence in Patiala: पटियालात दोन गटात हाणामारी; शहरात कर्फ्यू, वाचा सविस्तर काय आहे प्रकरण - पटियालामध्ये कर्फ्यू

पटियाला ( patiala news ) येथे खलिस्तानविरोधी मोर्चात दोन गट समोरासमोर ( khalistan murdabad march clashes ) आले होते. हिंदू संघटनांनी ह्या मोर्चा काढण्याची तयारी केली होती. त्याचवेळी काही शीख संघटनांनी त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातावरण इतके चिघळले की दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. यादरम्यान एसएचओ करणवीर यांनी शीख आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हाताला दुखापत झाली.

khalistan murdabad march clashes
खलिस्तानविरोधी मोर्चात दोन गट समोरासमोर
author img

By

Published : Apr 29, 2022, 6:01 PM IST

पटियाला (पंजाब) - पटियाला ( patiala news ) येथे खलिस्तानविरोधी मोर्चात दोन गट समोरासमोर ( khalistan murdabad march clashes ) आले होते. हिंदू संघटनांनी ह्या मोर्चा काढण्याची तयारी केली होती. त्याचवेळी काही शीख संघटनांनी त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वातावरण इतके चिघळले की दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. यादरम्यान एसएचओ करणवीर यांनी शीख आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर एसएसपी नानक सिंह घटनास्थळी पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी हवेत गोळीबार केला. यानंतर वातावरण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. खरे तर येथे शिवसेनेने खलिस्तानविरोधात पुतळा जाळण्याची तयारी केली होती. हे कळताच खलिस्तान समर्थकांनी निदर्शने सुरू केली. तेथे पोलिसांनी त्यांना थांबवून परत पाठवले. मात्र, शीख संघटनांचे सदस्य तलवारी घेऊन काली माता मंदिरात पोहोचले. दोन्ही बाजूंच्या मध्ये बराच वेळ वीटा, दगडांची चकमक सुरू होती.

पटियालामध्ये कर्फ्यू ( Curfew in Patiala ) - आज, 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 ते उद्या, 30 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. आज येथे झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडला आहे.

khalistan murdabad march clashes
खलिस्तानविरोधी मोर्चात दोन गट समोरासमोर

हाणामारी दरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार भाषणबाजी - पंजाब पोलीस आणि आम आदमी पक्षाच्या सरकारने या लोकांवर कठोर कारवाई करावी, असे हिंदू संघटनेचे नेते हरीश सिंगला म्हणाले. दुसरीकडे जसविंदर सिंग राजपुरा म्हणाले की, शीख संघटनांनी अनेक दिवसांपासून आवाहन केले होते की, काही संघटना शीख राजाच्या विरोधात वातावरण बिघडवत आहेत. प्रशासनाने या लोकांना अटक करायला हवी होती, जेणेकरून वातावरण बिघडू नये.

khalistan murdabad march clashes
खलिस्तानविरोधी मोर्चात दोन गट समोरासमोर

उपायुक्त आणि एसएसपी यांनी लोकांना आवाहन - यादरम्यान शीख आंदोलकांनी एसएचओचा हात कापल्याच्या बातम्या पसरू लागल्या. मात्र, पटियालाच्या डीसींनी याचा इन्कार केला आणि ते निराधार असल्याचे सांगितले. अशा अफवा पसरवू नका असे आवाहन त्यांनी केले. पटियाला रेंजचे आयजी राकेश अग्रवाल यांनी सांगितले की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. कोणीतरी अफवा पसरवली होती, त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली. एसएचओचा हात कापल्याचीही अफवा आहे. परिस्थिती पूर्णपणे शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस नेते सुखपाल खेहरा यांचे ट्विट - आज पटियाला येथे दिवसाढवळ्या झालेल्या हाणामारीबद्दल गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळे पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. भगवंत मान यांना निर्णय घेण्याची मोकळीक देण्याची वेळ आली आहे. दिल्लीतून अगदी छोटे निर्णयही रिमोट कंट्रोलने घेताना हेच घडते. पंबाज मॉडेलला काम करू द्या.

khalistan murdabad march clashes
खलिस्तानविरोधी मोर्चात दोन गट समोरासमोर

हेही वाचा - Patiala Violence : पंजाबमध्ये बाळ ठाकरे शिवसेना आणि खलिस्तानी समर्थक एकमेकांशी भिडले; पाहा व्हिडिओ

हेही वाचा - Anil Desai on Patiala incident : 'पटियाला घटनेशी शिवसेनेचा काडीचा संबंध नाही'

हेही वाचा - Patiala Shiv Sena khalistan Supporters Clash : पटियालात शिवसैनिक आणि खलिस्तानी समर्थकांमध्ये हाणामारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.