Chitra Wagh on Goa Election : गोव्याचे लोक पुन्हा एकदा भाजपला संधी देणार - चित्रा वाघ - Chitra Wagh on Goa Election
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ या ईटीव्ही भारतशी बोलताना ( Chitra Wagh special interview ETV Bharat ) म्हणाल्या, की मागील दोन वर्षांपासून गोव्यात डबल इंजिन सरकार ( Chitra Wagh on Goa Visit ) आहे. त्यामुळे गोव्याचा दुप्पट गतीने विकास झाला आहे. गोव्यात रस्ते, कायदा सुव्यवस्था, आरोग्य व्यवस्था उत्तम आहे. त्यामुळे गोव्याचे लोक पुन्हा एकदा भाजपला संधी देणार आहेत.
पणजी- गोवा आणि महाराष्ट्र यांचे एक वेगळे नाते आहे. गोव्याला नेहमीच पुढे जाण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा हात धरावा लागत आहे. गोव्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्यानिमित्ताने राज्यात भाजपचे अनेक नेते गोव्यात दाखल होत आहेत. मागील दोन दिवसांपासून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh on Goa Visit ) गोव्याच्या दौऱ्यावर होत्या. त्यानिमित्ताने ईटीव्हीने त्यांच्याशी खास बातचीत केली आहे.
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ ( Chitra Wagh special interview ETV Bharat ) या ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाल्या, की मागील दोन वर्षांपासून गोव्यात डबल इंजिन सरकार आहे. त्यामुळे गोव्याचा दुप्पट गतीने विकास झाला आहे. गोव्यात रस्ते, कायदा सुव्यवस्था, आरोग्य व्यवस्था उत्तम आहे. त्यामुळे गोव्याचे लोक पुन्हा एकदा भाजपला संधी देणार आहेत. पर्रीकर हे भाजपचा परिवार आहेत. मागील काही दिवसांपासून डावलल्यामुळे उत्पला पर्रीकर ( Chitra Wagh on Utpa Parrikars issue ) नाराज आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. यावर आपले मत व्यक्त करताना चित्रा वाघ म्हणाल्या, की उत्पल पर्रीकर हा भाजपचा परिवार आहे. भाजपने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विविध पर्याय दिले आहेत. यासंबंधीचा निर्णय केंद्रीय नेतृत्व व भाजप पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
हेही वाचा-Goa Assembly Election 2022 : गोव्यात शिवसेना जोमात, जनाधार कोमात ?
उत्पल पर्रीकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोवा भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नाराज उत्पल पर्रीकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ते योग्य निर्णय घेणार असल्याचा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला. डबल इंजिन सरकारमुळे भाजपला पुन्हा संधी मिळणार आहे. राज्यात आणि केंद्रात असणाऱ्या भाजपच्या सरकारचा फायदा हा राज्याचा विकासाला होत असतो. राज्य प्रगतीपथावर असते. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ( Goa Assembly election 2021 ) केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा राज्यात कमळ फुलणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोवेकर सुज्ञ आहेत, ते योग्य निर्णय घेणार असल्याचेही चित्रा वाघ यांनी सांगितले.
हेही वाचा-Goa Assembly Election : पर्रीकर, पार्सेकर, पाऊसकर आणि फर्नांडिस यांची पक्षाला सोडचिठ्ठी
तीन नेत्यांनी सोडला भाजप
उत्पल पर्रीकर (Rupali Parivar) आणि लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांच्यासोबत दीपक पाऊसकर व ईझींतोर फर्नांडिझ यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांनीही अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपला मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.